शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

इंदापूरच्या पश्चिम भागात ओढे, नाले तुडुंब

By admin | Updated: June 6, 2016 00:34 IST

इंदापूरच्या पश्चिम भागातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसाने भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी (दि.४) रोजी झालेल्या पावसाने इंदापूर तालुक्यात

लासुर्णे : इंदापूरच्या पश्चिम भागातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसाने भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी (दि.४) रोजी झालेल्या पावसाने इंदापूर तालुक्यात उच्चांक गाठला आहे. यामध्ये अंथुर्णेत सर्वाधिक ८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सलग तीन वर्षे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवत असताना २५ मेपासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले. हे नक्षत्रा कोरडे जाते की, काय अशी भीती शेतकऱ्यांना लागली होती. अशातच या नक्षत्राात पावसाने शुक्रवारी व शनिवारी दमदार हजेरी लावल्याने इंदापूरच्या पश्चिम भागातील ओढे, नाले तुडूंब वाहू लागले आहेत. मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच यामुळे बळीराजा सुखावला आहे. शनिवारी (दि. ४) रोजी पडलेल्या पावसाची नोंद इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात उच्चांकी झाली आहे. यामध्ये अंथुर्णे ८० मि.मी., निमगाव केतकी ४५ मि.मी., बावडा ३५ मि.मी. अशी झाली असल्याने इंदापूरच्या पश्चिम भागात पावसाची नोंद उच्चांकी झाली आहे. सध्या राज्यात दुष्काळाची दाहकता असल्याने बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट दिसून येत होते. शिरूर : शहर व परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाने आज संध्याकाळी पुन्हा हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बोऱ्हाडे मळा परिसरात झाड उन्मळून पडले, तर काही घरांचे पत्रे उडून गेले. काल (दि.४) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारासही वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. आठवडाभरात चौथ्यांदा पाऊस झाला. चार दिवसांपूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाने शहर व परिसरात हजेरी लावली. त्यानंतर परवा पुन्हा पाऊस झाला. काल रात्री दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा होता. मात्र, दिवसा पाऊस झाला नाही. मध्यरात्री दीडच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अर्धा तास हा पाऊस झाला. आजही आकाशात ढगाळ वातावरण होते. शहरात १० मिनिटातच पाऊस थांबला, मात्र वादळी वाऱ्यासह बोऱ्हाडे मळा परिसरात झालेल्या पावसाने झाडे उन्मळून पडले, तर अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले.