शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्या ठरताहेत वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:44 IST

ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी बीएसएनएलद्वारे तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला साईडपट्ट्या खोदण्यात आल्या. मात्र, त्या व्यवस्थेत न भरल्याने यात अडकून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. यामुळे या चाऱ्या आता वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी बीएसएनएलद्वारे तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला साईडपट्ट्या खोदण्यात आल्या. मात्र, त्या व्यवस्थेत न भरल्याने यात अडकून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. यामुळे या चाऱ्या आता वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.संपूर्ण भोर तालुक्यात ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी राज्यमार्ग, जिल्हामार्ग आणि गावातंर्गत रस्त्याच्या बाजूला चारी टाकून नवीन लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, या चारी व्यवस्थित बुजवल्या नाहीत. या चारीत पाणी साचल्यामुळे चिखल झाला आहे. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने या चारीत अडकून फसत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता भोरवरून सुटलेली कार्ले एसटीबस वडतुंबी गावाजवळ चारीत रुतल्याने ती अडकून पडली होती. यामुळे प्रवाशांना चालत जावे लागले. दुपारी ४ वाजता सुटलेली टिटेघर बस पान्हवळ गावाजवळ बंद पडल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या  बंद झाल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर अपघातातून प्रवासी नागरिक बचावले आहेत.यापूर्वी नीरा-देवघर धरणाच्या रिंगरोडने दुर्गाडीकडे जाणारी एसटी बस तर साळुंगण येथेही एसटीबस चारीत अडकून प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. तर काल वरोडी व वडतुंबी येथे एसटी बस अडकून अपघात झाला आहे. आठवड्यातून एकतरी एसटी बस चारीतअडकून पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा फटका प्रवाशांना होत आहे. यावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर यांनी दिला आहे.ग्रामपंचायत आॅनलाईन करण्यासाठी काढलेल्या मोठमोठ्या चाºयांत पावसाळा सुरु झाल्यापासून मागील दोन महिन्यांत चार ते पाच एसटी बसगाड्या अडकून अपघात झाले आहेत. दिवसभर वाहतुकीचा खोळंबा यामुळे होत आहे. याचा फटका आगाराला होत असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.- स्वाती आवळे,आगार प्रमुख, भोरग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे उद्दिष्टमार्च महिन्यात तालुक्यातील ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र अद्यापही कामे पूर्ण झाली नाहीत. धड ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या नाहीत आणि चाऱ्या  चांगल्या पद्धतीने बुजवल्या नाहीत. येथील गटारेही काढली नाहीत. रस्ता खोदल्यामुळे साईडपट्ट्या खचल्या. त्यात वाहने अडकून रूतत आहेत. गटाराचे पाणी रस्त्यावर वाहिल्याने खड्डे पडत आहे. यामुळे ही कामे करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.