शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कचरावेचकाच्या प्रामाणिकपणाचा वस्तुपाठ

By admin | Updated: June 28, 2017 04:21 IST

नेहमीप्रमाणे कचरा संकलन आणि वर्गीकरणाचे काम करीत असताना रस्त्याच्या मधोमध पडलेली बॅग आणि त्यामधील लॅपटॉप

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नेहमीप्रमाणे कचरा संकलन आणि वर्गीकरणाचे काम करीत असताना रस्त्याच्या मधोमध पडलेली बॅग आणि त्यामधील लॅपटॉप कचरावेचकाने प्रामाणिकपणे त्याच्या मालकाला परत केला. स्वच्छ संस्थेच्या समन्वयकाच्या मदतीने दोन दिवस शोध घेतल्यानंतर मालकापर्यंत पोहोचण्यात यश आले. विशेष म्हणजे हा लॅपटॉप टाटा मोटर्सचे विभागीय व्यवस्थापक नीलेश चौधरी यांचा होता. लक्ष्मण खंदारे (रा. पाटील इस्टेट वसाहत, शिवाजीनगर) बाणेर बालेवाडी भागामध्ये कचरा संकलनाचे काम करतात. शनिवारी त्यांना बालेवाडीमध्ये रस्त्याच्या मधोमध एक बॅग पडलेली दिसली. गाडीखाली जाऊ नये, म्हणून त्यांनी ही बॅग उचलून घेतली. बराच वेळ बॅग शोधत कोणीतरी येईल, या आशेने ते उभे होते. आसपासच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये बॅगेसंदर्भात चौकशी केली. परंतु, बॅगेच्या मालकाचा शोध लागला नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी बाणेर बालेवाडी भागाचे स्वच्छ संस्थेचे समन्वयक गजानन पाडुळकर यांना फोन करून माहिती दिली. रविवारी पुन्हा ते बॅग सोबत घेऊन नेहमीप्रमाणे कामावर गेले. गजानन यांनी त्यांची भेट घेतली. दोघांनी बॅगेतील कागदपत्रे आणि व्हिजिटिंग काडर््स तपासली. त्यामध्ये त्यांना चौधरी यांचे टाटा मोटर्सचे ओळखपत्र मिळाले. मात्र, त्यावर मोबाईल क्रमांक नव्हता. गजानन यांनी गुगलवर चौधरी यांच्या नावाने सर्च केले असता त्यांची संपूर्ण माहिती (प्रोफाईल) आले. परंतु, त्यामध्ये मोबाईल क्रमांक नव्हता. गजानन व खंदारे यांनी चौधरी यांच्या ईमेल आयडीवर लॅपटॉप आणि बॅगेसंबंधी माहिती कळविली. मात्र, ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या दोघांनी जवळच्या संगणक दुकानात जाऊन पासवर्ड उघडून पाहण्याची विनंती केली. मात्र, दुकानदाराने असे करणे योग्य नसल्याचे सांगत नकार दिला. दरम्यान, त्यांच्यामध्ये चौधरी टाटा मोटर्समध्ये काम करीत असल्याबाबत चर्चा झाली. योगायोगाने या दुकानदाराचा एक मित्र टाटा मोटर्समध्ये काम करीत होता. त्याच्याशी संपर्क साधून सर्व माहिती देण्यात आली. या मित्राने चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांची बॅग सापडल्याची माहिती दिली.चौधरी यांनी सोमवारी संध्याकाळी गजानन आणि खंदारे यांची भेट घेतली. या दोघांनी त्यांची बॅग आणि लॅपटॉप त्यांना परत केला. खंदारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करताना त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळले होते.