शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका, शिपाई चालवितात रात्रीच्या वेळी रुग्णालय!

By admin | Updated: November 8, 2014 23:31 IST

येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

निमगाव केतकी : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रुग्णालय रात्री फक्त एक परिचारिका व एकच शिपाई चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबरोबरच, वैद्यकीय अधिका:यांच्या दुर्लक्षामुळे या ग्रामीण रुग्णालयाच्या 
परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य 
पसरले आहे.
 गेल्या 3क्-4क् वर्षापासून 
नसबंदी शस्त्रक्रिया, विविध लस निमरूलन, विविध रोगांच्या साथीचे निमरूलन, सर्पदंश औषधोपचार आदींसाठी नावलौकिक येथील ग्रामीण रुग्णालयाने मिळविला आहे. परंतू या रुग्णालयाची जोपासना करण्यामध्ये सध्याचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी पडत असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
या ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी सेवा 
करताना चालढकल करीत असल्याने येथे उपचारांसाठी येणा:या रुग्णांना आवश्यकतेनुसार सेवा मिळत नाही. यामुळे या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी येणा:या नागरिकांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. यामुळे खासगी रुग्णालयाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. 
सद्य:स्थितीत मागील 6 महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी चालढकलीने काम करीत आहेत. काही ठराविक तळमळ असलेले वैद्यकीय अधिकारी काम करीत 
आहेत, तर काही रुग्णालयाकडे फिरकतच नाहीत. यामुळे रात्री काम करणा:या परिचारिका व शिपाई यांची अडचण होत आहे.
 रात्री एखादा रुग्ण आला, तर औषधोपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते. सेवा 
मिळत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून रुग्णालयाला 
कुलूप ठोकण्याचा प्रकार ब:याचदा घडला आहे; परंतु त्याकडे गांभीर्याने कोणीच पाहिले नाही.
                         (वार्ताहर)
 
4काही वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कामाचा, तर काही हंगामी कामाचा पगार घेत आहेत. रात्री कोणीच नसते. सर्व भ्रमणध्वनी बहुतेक वेळा बंद असतात; त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या ठिकाणी सर्व कर्मचा:यांना रुग्णांची सेवा करता यावी, यासाठी कर्मचारी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी वास्तव्यास नसतो. त्यामुळे  या इमारतीची दुरवस्था झाली आहे. 
 
 ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरळीत सुरु आहे. 3 वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात काम करतात. मात्र,गेल्या काही महिन्यांपासुन 2 अधिकारी रजेवर आहेत. केवळ 1  वैद्यकिय अधिकारी काम पाहत होते.सध्या रजेवर  गेलेले 1 वैदयकीय अधिकारी कामावर रुजु झाले आहेत. तसेच दुस:या अधिका:यांनी बदली मागितली आहे. कामावर रुजु होणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. गावातील काही ग्रामस्थ मद्यपान करुन कर्मचा:यांना शिवीगाळ करीत असल्याचा आरोप डॉ.फडणीस यांनी केला आहे. तसेच खोटी तक्रार करुन नाहक त्रस देत आहे.
- अभिजीत फडणीस, वैद्यकीय अधिकारी