शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

खेड वनपरिक्षेत्रात मोरांची संख्या वाढली

By admin | Updated: March 21, 2016 00:32 IST

खेड वनपरिक्षेत्रात वनीकरण, वनसंवर्धन आणि जनजागृती यांमुळे वनविषयक चळवळ सकारात्मक वाटचाल करीत आहे. याचे फलित म्हणून परिक्षेत्रात मोरांची संख्या चांगलीच वाढली आहे

राजगुरुनगर : खेड वनपरिक्षेत्रात वनीकरण, वनसंवर्धन आणि जनजागृती यांमुळे वनविषयक चळवळ सकारात्मक वाटचाल करीत आहे. याचे फलित म्हणून परिक्षेत्रात मोरांची संख्या चांगलीच वाढली आहे. तसेच संत तुकाराम वनग्राम पुरस्कारात परिक्षेत्रातील रानमळा आणि दोंदे या दोन गावांनी राज्यात प्रथम, तर मिरजेवाडी गावाने राज्यात द्वितीय पुरस्कार मिळविण्याचा बहुमान २००६ ते २००९ दरम्यान मिळविलेला आहे. गावोगाव वनसंरक्षण समित्या स्थापण्याचा निर्णय झाल्यानानंतर अनेक गावांनी या क्षेत्रात चांगली कामगिरी नोंदविली आहे. या वन चळवळीमुळे रानमळा, मिरजेवाडी, कमान, सांडभोरवाडी, वाकळवाडी, रेटवडी या गावांमध्ये मोरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या सर्व गावांच्या वनांमध्ये मोर आता सहजरीत्या दृष्टीस पडत आहेत. वनसंरक्षण समित्यांमुळे जनजागृती होऊन पशू आणि प्राण्यांची हत्या जवळपास थांबली आहे. लोकसहभागातून रोपवने वाढविली जात आहेत. कुऱ्हाडबंदी आणि वनेतर इंधनवापराच्या निर्णयामुळे वनसंरक्षण होत आहे. तसेच वनविभागाच्या मदतीने वनसंवर्धन करण्यात आल्याने दाट वने तयार झाली आहेत. या गावांमध्ये मातीचे बंधारे बांधल्याने वन्य पशूपक्ष्यांना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाल्याने त्यांची संख्या वाढली. तसेच अनेक गावांनी वनतळी घेतल्याचाही फायदा मोरांना झाला. रानमळा या गावात तर लोक वनसंरक्षण समितीतर्फे धान्य गोळा करून पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी टाकले जाते. या एकत्रित उपायांमुळे मोरांची संख्या वाढण्यास मदत झाली. खेड परिक्षेत्रातील मिरजेवाडी गावाने २००६-०७ साली संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळविला. या गावाचा जिल्ह्यात पहिला आणि राज्यात दुसरा क्रमांक आला. रानमळा गावाने २००७-०८ साली जिल्ह्यात आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवून संत तुकाराम वनग्राम पुरस्कार पटकाविला. तर दोंदे गावाने २००८-०९ साली जिल्ह्यात व राज्यात प्रथम क्रमांक मिळवत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारावर आपले नाव कोरले. एकाच तालुक्यातील तीन गावांनी राज्यस्तरावर मिळविलेले हे यश लक्षणीय आहे.