शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्यांच्या प्रमाणात रुग्णसंख्या होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मार्च एप्रिल महिन्याची तुलना करता मे महिन्याच्या प्रारंभापासून चाचण्यांचे प्रमाण घटले असले तरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात मार्च एप्रिल महिन्याची तुलना करता मे महिन्याच्या प्रारंभापासून चाचण्यांचे प्रमाण घटले असले तरी, दिवसाला ते सरासरी १६ ते १८ हजारांच्या दरम्यान आहे. शहरासाठी दिलासादायक बाब म्हणजे चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत असून, पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा सात हजारांपर्यंत गेला होता. त्यावेळी साधारणत: २५ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी दर होता, तो आजमितीला २१.६ पर्यंत खाली आला आहे. दरम्यान आज चाचण्यांचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाले असले तरी, कोरोनाबाधितांची संख्याही तीन हजाराने कमी होऊन चार हजाराच्या आत आली आहे. सध्यस्थितीला शहरातील चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण साधारणत: २१.६ टक्क्यांवर आहे.

कोरोना संसर्ग झाला आहे की हे तपासणीसाठी ७० टक्के चाचण्या या ‘आरटीपीसीआर’ व्दारे तर ३० टक्के चाचण्या या अ‍ॅण्टीजेन रॅपिडव्दारे करण्यात येत आहेत. रुग्णांची गरज व त्याची लक्षणे पाहून कोणत्या पध्दतीने कोरोनाची चाचणी करायची याचा निर्णय घेतला जातो. अनेकवेळा रुग्ण थेट रूग्णालयात दाखल होतात त्यावेळी तात्काळ चाचणी करून, अहवाल प्राप्तीसाठी अ‍ॅण्टीजेन रॅपिड टेस्ट उपयोगी पडते. परंतु, काही वेळेत लक्षणे असूनही अ‍ॅण्टीजेन टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह येत असतो, त्यामुळे अशा रुग्णांची पुन्हा ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी घेण्यात येते.

---------------------

शहरातील चाचण्या, रुग्ण व पॉझिटिव्हिटी दर

तारीख चाचण्या रूग्ण पॉझिटिव्हिटी दर

१ एप्रिल२०,६३१४,१०३१९.८३

८ एप्रिल२३,५९३७,०१०२९.७०

१५ एप्रिल२१,९२२५,३९५ २४.६०

२१ एप्रिल२४,४०९५,५२९२२.६५

२८ एप्रिल२०,२७७३,९७८१९.६१

१ मे १९,३३६४,०६९२१.०४

२ मे १६,६१०४,०४४ २४.३४

३ मे १२,२७६२,५७९२१.००

४ मे १५,०९८२,८७९ १९.०६

-----------------

आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह

‘आरटीपीसीआर’ व्दारे करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी ही अ‍ॅण्टीजेन चाचणीच्या तुलनेत अधिक अचूक असते. शंभर कोरोनाबाधित संशयितांची ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी केली तर यामध्ये ६५ ते ७० टक्के रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतात. तर अ‍ॅण्टीजेनमध्ये अचूकतेचे प्रमाण हे ५० टक्केच आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या अ‍ॅण्टीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह अहवाल आला तर त्या रुग्णास पुन्हा ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी करण्यास सांगण्यात येते.

----------------------