शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णवाहिका चालकांना मिळाली उसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाचे रुग्ण मागील आठवड्यापासून कमी झाल्याने रुग्णवाहिका चालकांनाही उसंत मिळाली आहे, आकडा दोन हजारांच्या खाली आल्याने प्रशासनाला ...

पुणे : कोरोनाचे रुग्ण मागील आठवड्यापासून कमी झाल्याने रुग्णवाहिका चालकांनाही उसंत मिळाली आहे, आकडा दोन हजारांच्या खाली आल्याने प्रशासनाला आणि पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. या काळात रुग्णांना नेण्या-आणण्याचे काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

शहरात मार्च आणि एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत गेले. याकाळात रुग्णालयात जागा मिळणे अवघड झाले होते. अनेक रुग्णांना तर रुग्णवाहिकेत मुक्काम करावा लागला होता. या काळात डॉक्टर, नर्स, प्रशासकीय अधिकारी प्रचंड व्यस्त होते. त्यांच्यावर कामाचा ताण होता. या काळात पालिकेच्या आणि १०८ रुग्णवाहिकेच्या चालकांवरही ताण आला होता. पालिकेच्या रुग्णवाहिकेसाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामध्ये दिवसाला २०० पेक्षा अधिक कॉल येत होते. तर, १०८ ला २५० पेक्षा अधिक कॉल येत होते.

पालिकेने या काळात खासगी रुग्णवाहिकांची सेवाही घेतली होती. कोरोना रुग्णांकरिता ६९ रुगवाहिका, नॉन कोविडसाठी ११ यासोबतच ऑक्सिजनच्या ८०, नॉन ऑक्सिजन १५ रुग्णवाहिका सेवेत ठेवल्या आहेत. या काळात सतत फोन येत असल्याने चालकांचीही मोठी धावपळ होत होती. सतत या रुग्णालयातून त्या रुग्णालयात पळावे लागत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून रुग्ण कमी झाल्याने कॉलचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे चालकांना थोडी उसंत मिळाली आहे.

-----

स्मशानभूमीमध्येही अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर ‘वेटिंग’होते. मात्र, प्रशासनाने स्मशानभूमींची वाढविलेली संख्या आणि पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास दिलेली परवानगी यामुळे हे वेटिंग कमी झाले आहे. तसेच, विविध सामाजिक संस्था या कामात मदत करीत आहेत.