शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांमध्ये वाढले गर्भपाताचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2015 03:26 IST

गर्भलिंग चाचणीबाबत कडक धोरण असताना देखील बारामतीसारख्या विकसित शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपात करण्याची आकडेवारी वाढत आहे.

बारामती : गर्भलिंग चाचणीबाबत कडक धोरण असताना देखील बारामतीसारख्या विकसित शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपात करण्याची आकडेवारी वाढत आहे. गर्भपातासाठी भले मोठे ‘पॅकेज’ घेतले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. कठोर कायदे करून देखील मुलगाच हवा यासाठी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केले जात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये देखील मागील ५ वर्षांत गर्भपाताची आकडेवारी वाढलेली असतानाच बारामतीसारख्या प्रगत शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत अनेक पटींनी गर्भपात केले जात असल्याची नोंद आहे. २०११-१२ ते २०१४-१५ या काळात सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात ४५७ गर्भपात करण्यात आले. तर या वर्षात आजअखेर ९१ गर्भपात केल्याची नोंद आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: गर्भलिंग चाचणीवर बंदी असताना देखील शेजारच्या जिल्ह्यांमध्ये गर्भलिंग तपासणी केली जाते. अनेक गर्भवती महिला त्या भागात जाऊन गर्भलिंग तपासणी करतात. शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयात गर्भपात केले जात असल्यामुळे सर्वाधिक गर्भपात स्त्री गर्भाचेच होत असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी सांगितले, की शहरात ३४ सोनोग्राफी केंद्रे आहेत. शासकीय परवानगी असलेली २७ गर्भपात केंदे्र आहेत. सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगीमध्ये अधिक गर्भपात होत असल्याची नोंद आहे. आम्ही सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करणार आहे. (प्रतिनिधी)गुजरात, सातारा, नगरमध्ये जाऊन गर्भपात गर्भलिंग निदान करण्यासाठी गुजरात राज्यासह सातारा, नगर आदी भागात जाणाऱ्या मंडळींचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: लिंग निदानानंतर स्त्रीभ्रूण असल्यास गर्भपात केला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या भागांमध्ये जाऊन लोक छुप्या पद्धतीने पैसे आकारून लिंगनिदान करतात व मुलगी असल्याचे समजल्यास गर्भपात घडवून आणतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.