पुणो : आठवडाभरापासून शहरात वाढू लागलेली थंडी महापालिकेच्या मदतीला धावली आहे. त्यामुळे महापालिकेकडून डेंगीविरोधात मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येत असलेली जनजागृती मोहीम आणि वाढत्या थंडीने डेंगीचे रुग्ण घटण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात या आजाराची लागण झालेले अवघे 5 रुग्ण आढळून आले. मागील महिन्यात हा आकडा सरासरी 5क्च्या घरात, तर दोन आठवडय़ांपूर्वी सरासरी 2क् ते 3क् होता.
गेल्या 4 महिन्यांत शहरात या आजाराची लागण झालेले तब्बल 3 हजार रुग्ण आढळून आले, तर सहा जणांना आपला प्राण गमवावा लागला होता.
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरात शहरातील घरन् घर पिंजून काढले होते. तसेच, गेला संपूर्ण आठवडा जनजागृती सप्ताह म्हणून राबविण्यात आला होता. परिणामी, शहरात डेंगीचे रुग्ण घटत असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली. (प्रतिनिधी)
तारीख रुग्ण
21 नोव्हेंबर 15
22 नोव्हेंबर 13
23 नोव्हेंबर 1क्
24 नोव्हेंबर 11
25 नोव्हेंबर 12
26 नोव्हेंबर 1क्
27 नोव्हेंबर 5
महिना रुग्णसंख्या
जुलै 63क्
ऑगस्ट 591
सप्टेंबर 918
ऑक्टोबर 56क्
नोव्हेंबर 27 328