शहरातील २८ आणि ग्रामीण ३३ रुग्णांसह आज ६१ रुग्ण आढळले. एकुण रुग्णांचा आकडा ५ हजाराच्या उंबरठ्यावर ४८९८ आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४४४१ आहे. तर एकुण १२७ जणांचे कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. सप्टेंबरमध्ये प्रतिदिन १०० पेक्षा अधिक आढळणारे रुग्ण जनता कर्फ्युनंतर कमी झाले होते. दिवाळीपुर्वी प्रतिदिन १० ते १५ रुग्णांचा आकडा दिवाळीनंतर चांगलाच तिप्पट चौपट वाढला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने बारामतीकर धास्तावले आहेत.
बारामती शहर, तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST