शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आता दैनिक पासही...!

By admin | Updated: July 28, 2016 04:04 IST

शालेय विद्यार्थ्यांची प्रवासासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विद्यार्थी ओळखपत्रावर दैनंदिन पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची प्रवासासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विद्यार्थी ओळखपत्रावर दैनंदिन पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे विद्यार्थ्यांना मासिक आणि साप्ताहिक अशी दोन वेगवेगळी ओळखपत्रेदेखील आता सांभाळावी लागणार नाहीत. पीएमपीने आखलेल्या नव्या धोरणानुसार हे पास देण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या पीएमपीकडून विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील व हद्दीबाहेरील पासेस पुरविण्यात येतात. त्यांची किंमत ६०० (हद्दीत) आणि ७५० रुपये (हद्दीबाहेर) अशी आहे. अनेकदा विद्यार्थ्यांचा मासिक पास शाळांना सुट्या लागण्याआधीच संपतो. अनेकदा केवळ परीक्षांसाठीच विद्यार्थ्यांना पासची गरजच असते. पण हा कालावधी जास्तीत जास्त दहा दिवसांचा असतो.आॅगस्टपासून सुरूअशा वेळी विद्यार्थी पूर्ण महिन्याचा पास काढण्याऐवजी रोज तिकीट काढून जाणे पसंत करतात किंवा साप्ताहिक पास काढतात. मात्र तो पास काढण्यासाठी पुन्हा ओळखपत्र तयार करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मासिक आणि साप्ताहिक असे दोन पास सांभाळावे लागत होते. मात्र आता मासिक पासवरच विद्यार्थ्यांना साप्ताहिक पास देण्यात येणार असल्याची माहिती पास विभागप्रमुख राजेश जाधव यांनी दिली. येत्या १ आॅगस्टपासून ही योजना लागू होणार आहे. दैनंदिन पास ७० रुपये आणि साप्ताहिक पास ३५० रुपयांना असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी यात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.