शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
4
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
5
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
6
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
7
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
8
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
9
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
10
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
11
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
12
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
13
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
14
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
15
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
16
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
17
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
18
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
19
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
20
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!

आता आमच्या संसाराचा गाडा कसाबसा चालेल!

By admin | Updated: December 23, 2015 00:07 IST

जिल्हा परिषदेने मंगळवारी ३८ जणांना अनुकंपावर नियुक्ती दिली. यानंतर नोकरी मिळालेल्या उमेदवारांनी व त्यांच्या पालकांनी घरातले कर्तेच गेल्याने संसाराचा

पुणे : जिल्हा परिषदेने मंगळवारी ३८ जणांना अनुकंपावर नियुक्ती दिली. यानंतर नोकरी मिळालेल्या उमेदवारांनी व त्यांच्या पालकांनी घरातले कर्तेच गेल्याने संसाराचा आडलेला गाडा आता कसाबसा रेटू शकतो, अशा प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिल्या. जिल्हा परिषदेत नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी किंवा मुलांना त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. आजार किंवा अपघातात घरातील कर्ती व्यक्तीच गेल्याने या कुटुंबांची मोठी परवड होत असते. पुणे जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर ४०० जागा रिक्त आहेत. ११४ जणांनी अनुकंपावर नोकरीत घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते. शासनाच्या नियमानुसार एका वर्षात १० टक्के जागा भरल्या जातात. यानुसार आज ३८ जणांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, सामान्य प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेत या उमेदवारांना नोकरीचे आदेश देण्यात आले. यात तीन जणांना ग्रामसेवक, सहा जणांना वरिष्ठ सहायक, १० जणांना कनिष्ठ सहायक, सहा जणांना कनिष्ठ सहायक लेखा, आठ जणांना आरोग्यसेवक पुरुष व चार जणांना परिचर पदाची नियुक्ती दिली. चार उमेदवारांनी ते उच्चशिक्षित असल्याने नियुक्ती नाकारली आहे. परिचर पदासाठी १२ उत्तीर्ण असलेल्यांना नोकरी देण्यात आली असून इतर पदांसाठी सर्व उमेदवार उच्चशिक्षित आहेत. यात काही जणांनी अभियंता पदाची पदवीही घेतली असल्याचे सत्यजित बडे यांनी सांगितले. यात २००७चे सर्वांत जुने प्रकरण असल्याचेही त्यांनी सांगितले.