हडपसर : प्रभाग क्र. २३ (हडपसर-सातववाडी)च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची जनसंवाद यात्रा मारुती आबा तुपे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सोपान गोंधळे, शिल्पा होले, उज्ज्वला जंगले यांच्यासह गाडीतळ येथील वेताळबाबा वसाहत व महात्मा फुले वसाहत येथे पार पडली.महापालिका आणि प्रतिनिधींच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचा समाचार घेताना मारुती आबा तुपे म्हणाले, ‘‘प्रभागात आवश्यकता असतानाही मॅटर्निटी हॉस्पिटल, अग्निशामक दल, नाना-नानी पार्क अशा प्रकारचे नियोजन वा उपलब्धता नाही. मग एक दशक विकासाचे कसे काय असू शकते? प्रभागात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला पूल गैरसोयीचा होत आहे. अनेक प्रकल्प अजूनही धूळ खात पडून आहे. अनियोजित व अर्धवट कामांचे हे उदाहरण कोणाच्याही सहज लक्षात येईल, असेच आहे.’’मतदारांना जागरुक करताना शिल्पा होले म्हणाल्या, ‘‘एक दशक विकासाचे असे म्हणत कामे अर्धवट ठेवणे व लोकांची दिशाभूल होत आहे.’’ जनसंवाद यात्रेप्रसंगी युवराज मोहरे, अमित गायकवाड, फिरोज शेख, सोनू काळंगे, वसंत कुल, माऊली महामुनी, अभिजित मरगै, नीतेश झेंडे, पप्पू मोरे, विनय झगडे, मनोज पन्हाळे, महेश गाडेकर, सचिन पन्हाळे, विजय काळे आदी कार्यकर्ते याचबरोबर कल्पना राऊत, उज्ज्वला राऊत, स्वाती सातव, अर्चना होले, नंदा होले, शशिकला होले, सुरेखा टिळेकर, सोनाली जगताप, मीनल जगताप, प्रणाली आपटे, अनिता बोराटे, आशा शेजवळ, अर्चना होले, आशा धुमाळ, जयश्री पाटील, सुमन चौघडे, मनीषा चौरे, पुष्पा स्वामी, राजश्री मोहिते, शैला बनसोडे, अश्विनी चौधरी, शुभांगी शिंदे, शालिनी बनसोडे, नीलम नरोडे आदी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आता ‘नो उल्लू बनाविंग’ : मारुती तुपे
By admin | Updated: February 14, 2017 02:18 IST