शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता नवी वृक्ष प्राधिकरण समिती

By admin | Updated: March 17, 2017 02:43 IST

स्थापनेपासून वादविवादानेच गाजलेली महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्यात आली असून, नवी समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे

पुणे : स्थापनेपासून वादविवादानेच गाजलेली महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्यात आली असून, नवी समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पूर्वीच्या समितीपेक्षा नवी समिती कमी सदस्यांची असणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या ९८ सदस्यांमुळे आता या समितीवरही भाजपाचेच वर्चस्व असेल, असे दिसते आहे.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाप्रमाणे पंचवार्षिक सभागृहाची मुदत संपताच वृक्ष प्राधिकरण समितीची मुदतही संपुष्टात येते. नव्या पंचवार्षिकमधील पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर १ महिन्याच्या आतच नवी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आयुक्तांनी नगरसचिव कार्यालयाला समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. नगरसेवकांपैकी किमान ५ ते कमाल १५ सदस्य नियुक्त करावे, असे महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंवर्धन व जतन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशासकीय सदस्य म्हणून ७ सदस्यांची नियुक्ती करता येते, त्यात विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना प्राधान्य देण्यात यावे, असे म्हटले आहे.राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक महापालिकेला वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. यापूर्वीच्या समितीत तब्बल २६ सदस्य होते. त्यातील १३ निवडून आलेले व १३ अशासकीय सदस्य होते. स्थापना झाल्यापासून ही समिती वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त होत गेली. त्यातील अशासकीय सदस्यांच्या पात्रतेवरच काही संस्थांनी हरकत घेतली. काहीजणांनी थेट न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे समितीवर काही बंधने आली. त्यांचे काही निर्णयही वादग्रस्त झाले. आता नव्या निर्णयानुसार अशासकीय सदस्य म्हणून फक्त ७ जण घ्यायचे आहेत. त्यामुळे नगरसेवकांमधूनही ७ जणच घेतले जातील. आयुक्त समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे समितीचे एकूण सदस्य १६ होतील.(प्रतिनिधी)