पुणे : शहरातील नागरिक; तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचा व लेखी पत्रव्यवहारांचा निपटारा करून, महापालिकेच्या कारभारातही झीरो पेन्डेन्सी आणण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींबाबत डोळ्यांवर पांघरूण ओढलेले आणि सुस्त झालेल्या प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्याबरोबरच वर्षानुवर्षे धूळ खात पडून असलेल्या फाइलीही निकाली निघणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, २९ सप्टेंबरपर्यंत सर्व विभाग प्रमुखांना या तक्रारींचा निपटारा करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिला आहे. यामुळे नागरिकांची कामे सुकर होणार आहे. (प्रतिनिधी)
आता महापालिकेतही ‘झीरो पेन्डेन्सी’
By admin | Updated: September 12, 2014 03:12 IST