शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

"आधी परीक्षेसाठी आंदोलन"; आणि आता ११ एप्रिलची 'एमपीएससी'ची परीक्षा पुढे ढकला अशी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 01:34 IST

काही जणांना कोरोनाची बाधा तर काही अंगावर दुखणे काढताहेत..

पिंपरी : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आता ११ एप्रिलची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमपीएससीने १४ मार्च २०२१ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात परिक्षार्थींनी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील असे स्पष्ट केले. एमपीएससीची 21 मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या 11 एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी करीत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करीत असलेल्या वैभव शितोळे या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या नंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे.---/मला कोरोना झाला आहे. सौम्य लक्षणे असली तरी खबरदारी म्हणून मी पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झालो आहे. येत्या बुधवारी रुग्णालयातून सोडण्यात येईल. येत्या अकरा तारखेची परीक्षा चुकू नये म्हणून, अनेकजण दुखणे अंगावर काढत आहेत. त्यामुळे परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  गेल्या महिन्यातील स्थिती वेगळी होती. आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे सरकारने परीक्षा पुढे ढकलावी.महेश घरबुडे, एमपीएससी परीक्षार्थी----गेल्या तीन वर्षांपासून एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करीत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निम्म्याहून अधिक  विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलावी असे वाटते. अनेक परीक्षार्थी बाधित आहेत. परीक्षा चुकू नये यासाठी अंगावर दुखणे काढत आहेत. तसेच अभ्यासिकेत जाऊन अभ्यासही करीत आहेत. त्यामुळे किमान महिनाभर तरी परीक्षा पुढे ढकलावी. गेल्या वेळेस परीक्षेवरून राजकारण झाले. तसे आता होऊ नये.रक्षित मेश्राम, एमपीएससी परीक्षार्थी, नागपूर विभाग----परीक्षा पुढे ढकलावी की नाही याबाबत टेलीग्रामवर परिक्षार्थीचे मत आजमविण्यात आले. सुमारे आठ हजार जणांनी आपले मत नोंदविले. त्यातील ५१ टक्के जणांनी परीक्षा पुढे ढकलू नये अशी भूमिका घेतली. तर, ४९ टक्के जणांनी परीक्षा पुढे ढकलावी असे सांगितले. जवळपास दोन वर्षांनी परीक्षा होत आहे. त्यामुळे परीक्षा ढकलू नये असे एक मत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक जण अंगावर दुखणे काढत आहेत. परीक्षेच्या तोंडावर कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यास परीक्षेला मुकावे लागेल अशी भीती अनेकांना आहे. परिक्षार्थीच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळू नये असे दुसरे मत आहे. सरकारनेच त्यावर आता योग्य तो निर्णय घ्यावा.राहुल कवठेकर, एमपीएससी समन्वय समिती

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसStudentविद्यार्थीMPSC examएमपीएससी परीक्षा