शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कामे रखडल्यास आता ५ हजारांचा दंड, जिल्हा परिषदेतील यंत्रणांचा वेग वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 03:52 IST

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचा वेग वाढविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेत सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल.

निनाद देशमुख पुणे : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचा वेग वाढविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेत सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल. कुठलेही प्रकरण पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी राहणार असून, त्यापुढे कामाला विलंब झाल्यास त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना दररोज ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. मे महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागांमधील अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा मिळत नाहीत. त्यांची प्रकरणे मंजूर न झाल्याने नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच, विविध योजनांसाठी नागरिक जिल्हा परिषदेत अर्ज मंजूर करीत असतात. त्यांना त्याविषयी पूर्ण माहिती नसल्याने काही कागदपत्रांअभावी त्यांची प्रकरणे नामंजूर केली जातात. काही अर्जांमध्ये दुरुस्ती सुचवली जात असल्याने ती प्रकरणेसुद्धा मागे ठेवली जात असल्यामुळे नागरिकांना योग्य सेवा मिळत नाही. काही वेळा लाचेची मागणी केली जात असल्यानेही कामे होत नाहीत. यामुळे यापुढे जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल. त्यानुसार प्रत्येक विभागाला वेळापत्रक दिले जाणार आहे. कुठलीही प्रकरणे विभागात आल्यावर ती पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. तसेच, त्यासाठी लागणारी कागदपत्रे योग्य आहेत का? याची माहिती संबंधितांना आधीच दिली जाणार आहे. यानंतर अर्जदारांनी तसेच तक्रारदारांची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना १५ दिवसांची मुदत देतील. या मुदतीत ही कामे न झाल्यास त्यासाठी जबाबदार असणाºयाला काम पूर्ण होईपर्यंत दररोज ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. यासाठी वेगळी यंत्रणा मे महिन्यापासून लागू करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.मॉनिटर पथक ठेवणार वॉचजिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत नागरिकांना योग्य सेवा मिळते की नाही, याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र मॉनिटर पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक सर्व विभागांवर वॉच ठेवेल.विभागात रोज कीती प्रकरणे आली? ती पूर्ण करण्याचा कालावाधी किती राहणार? तसेच ती कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण झाली की नाही? याची सर्व माहिती हे पथक ठेवेल. कामाला विलंब लावणाºयांना पथक जाब विचारणार असून, संबंधितांना उशीर झाल्यास दंड ठोठावला जाईल.