शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता अभिजात भाषेचा लढा केंद्रपातळीवर

By admin | Updated: May 7, 2017 02:42 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे. भिलार येथे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे. भिलार येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जाची याचिका उच्च न्यायालयात निकाली निघाल्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. साहित्य महामंडळासह सर्व साहित्य संस्थांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि सातारा शाखेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. ही चळवळ केवळ साहित्य संस्थांपुरती मर्यादित न राहता व्यापक लोकचळवळ व्हावी, या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.मसाप, शाहूपुरी शाखेच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला पत्रे पाठविण्यात आली आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन कार्यवाहीबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला कळवले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अवर सचिव कंवरजित सिंग यांनीही पत्र पाठवले असून त्यात मद्रास उच्च न्यायालयात याबाबत असलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. त्यामुळे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कार्यवाही सुरू केल्याचे कळवले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. २८ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पुण्यातील मान्यवर लेखक, साहित्यिकही सहभागी झाले होते. या वेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले. अभिजात भाषेच्या दर्जाची चळवळ ही लोकचळवळ होण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, प्रौढ व्यक्ती, राजकारणातील व्यक्ती यांचाही समावेश असणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने प्रक्रिया करण्यात आली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. इतर प्रादेशिक भाषांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना पत्रांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. मराठी भाषेसाठीही अशाच प्रकारे पत्रांची मोहीम हाती घेण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १४ जिल्ह्यांमधील शाखांनी पत्रांसाठी पुढाकार घेतला. एकट्या सातारा शाखेने ७०,००० पत्रे गोळा केली. सर्व शाखांनी मिळून १ लाख पत्रांची मोहीम यशस्वी केली. या सर्व प्रक्र्रियेमध्ये मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ यांच्याकडून क्रियाशील पाठिंबा मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अभिजात भाषेच्या दर्जाची याचिका न्यायप्रविष्ट असल्याचे कारण इतके दिवस पुढे केले जात होते. आता ही याचिका निकाली निघाल्यामुळे या प्रक्रियेमधील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आमदार, खासदार स्वत:च्या मानधनासाठी अल्पावधीत ठराव समंत करून घेऊ शकतात. मग, साहित्य, संस्कृतीशी संबंधित निर्णयाला एवढा विलंब का लागतो, तेच कळत नाही. भाषेचा प्रश्न प्रलंबित राहू न देण्याच्या दृष्टीने ही चळवळ अखंड सुरूच राहणार आहे. साहित्य महामंडळानेही या चळवळीला पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, याबाबत कोणाचेच दुमत नाही. शिखर संस्था असल्याने महामंडळावर काही मर्यादा येत असल्याने घटक संस्थांनी या चळवळीमध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. याबाबत पंतप्रधानांसह सर्व खासदार, तसेच सभापतींना पत्र लिहिले जाणार आहे.