शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मूठमातीकडून आता अग्निसंस्कारांकडे...

By admin | Updated: March 30, 2017 00:18 IST

सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात

नीरा : सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात वास्तव्यास असणाऱ्या देऊळवाले समाजात कायमच्या भटकंतीमुळे मृत्यूनंतर मूठमाती देण्याची प्रथा होती. परंतु या समाजातील एका महिलेच्या निधनानंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.तुकाई टेकडीच्या खाली देऊळवाले समाजातील लोकांची वस्ती आहे. त्यांची पाच ते सहा घरे आहेत. येथील पूनम शंकर निंबाळकर (वय २५) या महिलेचे निधन झाले. हा समाज आजवर भटके जीवन जगत आला आहे. भटकंती दरम्यान एखाद्याचे निधन झाल्यास त्याच्या मृतदेहाला मूठमाती दिली जाई. आता मात्र स्थिर जीवन जगत असल्याने मृतदेहाला अग्निसंस्कार देणे अधिक योग्य आहे, असा निर्णय समाजातील ज्येष्ठांनी घेतला. मात्र गावात अग्नीसंस्कार करून देण्यास काहींचा विरोध होता. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी या कुटुंबांना धीर दिला व गावच्या सरपंच रत्नमाला जगताप यांचे पती व सांसद आदर्श ग्राम समित्यांचे समन्वयक सुरेश जगताप यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. जगताप यांनी देऊळवाले समाजातील नागरिकांच्या भूमिकेला पाठबळ दिले.आजही गावाबाहेरच..अनेक वर्षांपासून ही कुटुंबे गावाबाहेर उघड्यावर संसार थाटून आपली उपजीविका करत आहेत. शिधापत्रिका, मतदानकार्ड असूनही आजही या लोकांना गावाचे रहिवासी ठरविण्यात येत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.