पुणो : सध्याचे कृषी शिक्षण उद्योग जगताला आणि कृषी क्षेत्रला जोडणारे नाही,तसेच शेतक-यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नाही.त्यामुळे देशातील कृषी अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात असून पुढील शैक्षणिक वर्षापासून किंवा 2016-2017 या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे,अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्याचा विचार करता कृषी शिक्षण,संशोधन व विस्तार शिक्षण या त्रीसुत्रीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ही चार विद्यापीठे काम करत आहेत. या विद्यापीठांशी 166 महाविद्यालये संलग्न आहेत. त्यामध्ये कृषी उद्यानविद्या, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमात 14 हजारांच्यावर विद्यार्थी शिकत आहेत. (प्रतिनिधी)