शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामानंतर आता रस्ता कायद्याच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:22 IST

मुठा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा फटका खाल्ल्यानंतर महापालिकेच्या विरोधात आता नदीपात्रातील विठ्ठलवाडी येथील रस्त्याच्या कामावरून याचिका दाखल झाली आहे.

पुणे : मुठा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा फटका खाल्ल्यानंतर महापालिकेच्या विरोधात आता नदीपात्रातील विठ्ठलवाडी येथील रस्त्याच्या कामावरून याचिका दाखल झाली आहे. पूररेषेच्या बाहेरील रस्ता उखडून काढण्याचे कारस्थान महापालिका करीत असून, त्याला स्थानिक रहिवाशांनी संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर विरोध सुरू केला आहे.सन प्लॅनेट रेसिडेन्ट्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेने महापालिका पूररेषेच्या बाहेरील रस्त्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे. काही वर्षांपूर्वी विठ्ठलवाडी ते वारजे हा २४ मीटर रुंदीचा रस्ता विकास आराखड्यात दाखवला होता. त्याप्रमाणे सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला.मात्र, पर्यावरणवादी संस्थांनी रस्ता नदीपात्रातून जात असल्याचा आक्षेप घेत महापालिकेच्या विरोधात न्यायाधिकरणात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात निकाल लागला. न्यायालयाने महापालिकेला पूररेषेच्या आतील रस्ता उखडून काढण्याचा आदेश दिला, त्याचबरोबर आवश्यक असेल तर नदीपात्रात वरच्या बाजूने (इलिव्हेटेड) रस्ता बांधावा, असेही सुचवले. १५ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता उखडण्यासाठी पुन्हा काही कोटी रुपये खर्च करावे लागले.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. महापालिकेचा प्रयत्न चुकीचा असून रस्ता पुररेषेच्या बाहेर आहे. सोसायट्यांचा वहिवाटीचा रस्ता कायमचा बंद होणार आहे तर काहींची घरेच राहणार नाहीत असा मुद्दा संघटनेने याचिकेत उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्त तसेच शहर अभियंता यांना नोटीसही बजावली आहे.