पुणे : हवामानाची अधिक अचूक माहिती मिळण्यासाठी देशातील ६० पायलट बलून निरीक्षक केंद्रे, ६ महिन्यांत जीपीएसद्वारे चालविण्यात येणार असल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ़ डी़ प्रधान यांनी सांगितले़ हवामान विभागाच्या मोसम विज्ञान प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘उपकरण देखभाल आणि अंशाकन’ विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवारी झाले़, या वेळी ते बोलत होते़ हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक बी़ मुख्योपाध्याय, सरफेस इन्स्ट्यिुमेंट विभागाचे शास्त्रज्ञ आऱ आऱ माळी, शास्त्रज्ञ के . एऩ मोहन, डॉ़ के. व्ही़ पडगलवार आदी उपस्थित होते़डॉ़ प्रधान म्हणाले की, गुणवत्तापूर्ण निरीक्षणे नोंदविलेल्या माहितीचा साठा अत्यंत महत्त्वाचा आहे़ हवामान बदलाची नोंद घेताना २० ते ३० वर्षांतील हवामानात कसा-कसा बदल घडत गेला, हे आपल्याला या माहितीवरून समजून येईल़ अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती ही जागतिक संपत्ती आहे़ ही माहिती अधिक अचूक आणि गुणवत्तापूर्ण असण्यासाठी, त्यासाठी लागणारी उपकरणे आणि त्यांची देखभाल चांगली असणे आवश्यक आहे़ यासाठीचे चांगले प्रशिक्षण पुण्यात आम्ही देऊ शकतो़ चार आठवडे चालणाऱ्या या कार्यशाळेची माहिती मुख्योपाध्याय यांनी दिली़ (प्रतिनिधी)
आता जीपीएसवर ६० पायलट बलून निरीक्षक केंद्रे
By admin | Updated: November 16, 2016 06:29 IST