शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात छोटा राजन टोळीचा हस्तक पुण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षांपासून फरार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षांपासून फरार असलेल्या छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने कोंढव्यातून अटक केली आहे.

परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे.

पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदू वाझेकर व आदित्य दाढे यांची मार्केट यार्ड या भागात जमीन आहे. परमानंद ठक्कर याने या जागेसंदर्भात बनावट कागदपत्रे तयार केली होती. तो प्रथम कुख्यात गुंड अश्विन नाईक याच्याकडे गेला होता. परंतु, त्याने मदत न केल्याने ठक्कर सुरेश शिंदे याच्याशी संपर्क साधला व नंदू वाझेकर यांना घेऊन चेंबूरला गेला होता. त्यावेळी सुरेश शिंदे व छोटा राजन यांचे फाेनवर बोलणे झाले. त्यावेळी छोटा राजन याने वाझेकर यांना २५ कोटी रुपये दे, सर्व प्रकरण मिटवतो. नाही तर तुला बघून घेऊ, तुला खलास करू, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी २०१५ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजे, त्याच्या टोळीतील सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमीत म्हात्रे यांना नवी मुंबई प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी २ वर्षे कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यातील संशयित परमानंद ठक्कर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांना ठक्कर हा पुण्यात राहत असल्याचे समजले त्यावरुन त्यांनी सीबीआयच्या पुणे व मुंबई कार्यालयातून माहिती घेतली. त्यानंतर कोंढव्यातील उच्चभ्रू भागात राहणाऱ्या ठक्कर याला मंगळवारी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार योगेश जगताप, अजय थोरात, सचिन जाधव, महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी ही कारवाई केली.