शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

शासकीय अधिकाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: October 9, 2016 05:06 IST

वर्षानुवर्षे शासकीय निवासस्थानात ठाण मांडून बसलेल्या सुमारे ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नोटीस बजावली आहे.

पुणे : वर्षानुवर्षे शासकीय निवासस्थानात ठाण मांडून बसलेल्या सुमारे ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नोटीस बजावली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान दिले जाते. मात्र, अनेक कर्मचारी-अधिकारी घराचा ताबा सोडण्यास तयार नसल्याने सक्तीने निवासस्थाने रिकामी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे व मुंबईसारख्या शहरांत मोठ्या प्रमाणावर शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या शहरांत कायमच शासकीय निवासस्थानांसाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. सध्या शहरात वर्ग एक व दोनमधील सुमारे ४०० अधिकारी प्रतीक्षायादीत आहेत. या अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांकडून निवासस्थानांचे वाटप केले जाते. तर, वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सदनिकांचे वाटप केले जाते. या श्रेणीतील १ हजार ३०० कर्मचाऱ्यांना अद्याप निवासस्थान मिळालेले नाही. शासकीय सेवेतून निवृत्ती अथवा बदली झाल्यास संबंधित सदनिका सोडणे आवश्यक असते. वर्ग एक व दोन श्रेणीतील अधिकाऱ्यांकडून निवासस्थाने सोडण्याबाबत फारसा त्रास होत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. मात्र, वर्ग तीन व चारमधील कर्मचारी एकदा सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर पुढील २५ ते ३० वर्षे निवासस्थान सोडत नाहीत. यांतील बहुतांश कर्मचाऱ्यांची बदली जिल्ह्यातच होत असल्याने निवासस्थान दीर्घ काळापर्यंत त्याच कर्मचाऱ्याकडे राहते. याबाबत बोलताना पीडब्ल्यूडीचे अधिकारी म्हणाले, ‘‘शासकीय निवासस्थानांंची मुदत संपलेली असताना वर्ग ३ व ४ मधील ३५ कर्मचाऱ्यांनी घराचा ताबा सोडलेला नाही. त्यांना घर रिकामे करण्याची दुसरी नोटीसदेखील पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी घर सोडलेले नाही. यामुळे अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रकरणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून मुदत संपल्यानंतरच्या कालावधीसाठी ३५ रुपये चौरसफुटाप्रमाणे अतिरिक्त भाडे वसूल करण्यात येईल.(प्रतिनिधी)येरवड्यात सातशे क्वार्टर बांंधणारशहरातील शासकीय निवासस्थानांची मागणी पाहता, आणखी दीड हजार सदनिकांची आवशकता आहे. येरवडा येथे आणखी ५०० ते ७०० क्वार्टर बांंधण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.