शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांच्या नोटिसांचा घोळ

By admin | Updated: December 20, 2015 02:26 IST

शहरामध्ये सार्वजनिक रस्ता, सोसायटी, खासगी जागेत अनधिकृतपणे बांधकाम झाले असल्यास नोटिसा बजाविताना मधली पाने गाळून नोटिसा बजाविल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

- दीपक जाधव,  पुणे

शहरामध्ये सार्वजनिक रस्ता, सोसायटी, खासगी जागेत अनधिकृतपणे बांधकाम झाले असल्यास नोटिसा बजाविताना मधली पाने गाळून नोटिसा बजाविल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. नोटिसा न बजाविलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करताना मागील तारखांना नोटीस दिल्याची दाखविण्यासाठी ही पाने गाळली जात असल्याची तक्रार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे करण्यात आली आहे.शहरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली असतानाही, त्यावर कारवाई होत नाही. उच्च न्यायालयाने याबाबत खडसावल्यानंतरही केवळ पथारी व्यावसायिक, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई केली जात आहे, अनधिकृत बांधकाम करणारे मात्र कारवाईपासून दूर राहत आहेत. महापालिकेकडे अनधिकृत बांधकामाची तक्रार आल्यानंतर, त्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित सोसायटीनेच अनधिकृत बांधकाम काढून टाकावे, असे पत्र बांधकाम विभागाकडून दिले जात आहे. त्याचबरोबर राजकीय दबावापोटी विशिष्ट अनधिकृत बांधकामांवरच कारवाई करणे, असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. कोथरूड परिसरातील रहिवासी वैभव घळसासी यांनी याप्रकरणी बकोरिया यांच्याकडे तक्रार केली आहे. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामार्फत परिसरातील अनधिकृत बांधकामांना सप्टेंबर महिन्यामध्ये नोटिसा बजाविण्यात आल्या. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम असताना, काही विशिष्ट लोकांनाच या नोटिसा बजाविण्यात आल्या. इतर अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार येऊनही ‘तुम्हीच सोसायटीमार्फत ते बांधकाम काढून टाका,’ असे पत्र संबंधितांना देण्यात आले. नोटिसांची पुस्तिका माहिती अधिकारांतर्गत तपासली असता, त्यामध्ये आणखी गोंधळ केल्याचे उजेडात आले. या पुस्तिकेमध्ये ८४२२ या क्रमांकाची नोटीस दिल्यानंतर ८४२३, ८४२४, ८४२५, ८४२६ ही पाने कोरी ठेवण्यात आली. त्यानंतर ८४२७ क्रमांकाची नोटीस बजाविण्यात आली. ही पाने का कोरी ठेवली, याची अधिक माहिती घेतली असता, मागील तारखांच्या नोटिसा दाखविण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे घळसासी यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार केली आहे.बकोरिया यांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली असून, खुलासा मागविला आहे.राजकीय दबावापोटी कारवाईकाही सोसायट्यांमधील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी आल्यानंतर, नोटिसा बजावून लगेच कारवाई करण्यात आली आहे; मात्र काही सोसायट्यांमधील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार आल्यानंतर, संबंधित सोसायटीनेच ते बांधकाम काढावे, असे पत्र बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहे.राजकीय दबावापोटी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली किंवा टाळली जात असल्याच्या तक्रारी अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक असलेल्या राजकीय व्यक्तींकडून अतिक्रमण कारवाईमध्ये मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे.अतिक्रमणांच्या नोटिसांवर बांधकाम विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंता, यांच्या सह्या असतात. त्या पुस्तिकेमध्ये मी सह्या केल्या होत्या; मात्र कनिष्ठ अभियंत्यांकडून मधल्या पानांवर सह्या करण्याचे चुकून राहिल्याने, मधली पाने कोरी राहिली. ही चूक लक्षात आल्यानंतर, लगेच त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.- अजय वायसे, उपअभियंता, पुणे महापालिका