पुणे : डेंगूच्या डासांची पैदास आढळल्याने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ला महापालिकेने नोटीस बजावली आहे. बीएसएनएलच्या पुणे स्टेशनजवळील जीपीओ येथील स्टाफ क्वार्टर्समध्ये डासोत्पत्ती आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. दरम्यान, आज दिवसभरात डेंगूची लागण झालेले १० नवीन रुग्ण आढळून आले. रुग्णांची संख्या ३ हजार १००वर पोहोचली आहे.डेंगूवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरात हाऊस-टु-हाऊस तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तीत शहरातील शासकीय कार्यालयांची तपासणीही केली जात आहे. याअंतर्गत गेल्या आठवड्यात ससून डॉक्टर्स क्वार्टर्स व सहकार आयुक्त कार्यालयास डेंगूच्या डासोत्पत्तीसाठी आरोग्य विभागाने नोटीस बजावली होती. डेंगू नियंत्रणासाठी महापालिका पथनाट्याद्वारे जनजागृती करणार असल्याचे डॉ. वावरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
डेंगूच्या डासोत्पत्तीची बीएसएनएलला नोटीस
By admin | Updated: November 6, 2014 23:42 IST