शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांकडून सूचना, पर्यायांचा पाऊस

By admin | Updated: December 4, 2014 04:59 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत राज्यव्यापी धोरण ठरविण्यासाठी स्थापन झालेल्या समितीची बैठक चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात झाली

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत राज्यव्यापी धोरण ठरविण्यासाठी स्थापन झालेल्या समितीची बैठक चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात झाली. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत तोडगा काढण्यासंबंधी सूचना करणाऱ्या शहरातील नागरिकांनी, तसेच पदाधिकाऱ्यांनी समितीला नवे पर्यायसुद्धा सुचविले आहेत.अवैध बांधकामे नियमितीकरणाबाबत सर्वसमावेशक असे धोरण ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीची बैठक पिंपरी-चिंचवडमध्ये झाली. समिती स्थापन झाल्यानंतर दोन बैठका मुंबईत झाल्या. तिसरी बैठक पिंपरी-चिंचवडमध्ये झाली. पिंपरी पदाधिकाऱ्यांबरोबर समिती अध्यक्ष, तसेच सदस्यांनी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. ज्या नागरिकांनी अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासंदर्भात सूचना दिल्या आहेत, त्या सूचनांचाही विचार करण्यात आला. ८६ नागरिकांनी सूचना नोंदवल्या असून, कोणत्या स्वरूपाची अनधिकृत बांधकामे कशी नियमित करता येतील, याबाबत पर्यायसुद्धा सुचविले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप, मारुती भापकर, तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत नागरिकांनी विविध पर्याय ठेवले आहेत. आमदार जगताप, तसेच आमदार व स्थायी समितीचे सभापती महेश लांडगे यांनंी अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने शास्तीचा प्रश्न गंभीर बनल्याचा मुद्दा उपस्थित केला.शहरातील अनधिकृत बांधकामे वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. विनापरवाना, नदीपात्रातील, रेडझोन हद्दीतील, तसेच आरक्षणाच्या जागेवरील अशा बांधकामांमुळे धोरण निश्चित करणे गुंतागुंतीचे बनले आहे. महाराष्ट्र प्रांतिक नगररचना अधिनियम विकास आराखडा, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल, नदीपात्रातील बांधकामांना प्रतिबंधित करणारी निळी व लाल पूरनियंत्रण रेषा या बाबी, त्या खात्याचे नियम यांचा आधार घेतला जाणार आहे. पाटबंधारे खाते, संरक्षण खाते, एमआयडीसी, रेल्वे, प्राधिकरण अशा संस्थांशी समन्वय साधावा लागणार आहे. त्यानंतर तोडगा काढण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल, असे कुंटे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)