शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बदल : नागरिकांच्या रोषाने कर्मचारी हैराण

By admin | Updated: November 17, 2016 01:59 IST

आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक पोस्ट आॅफिसमध्ये अद्याप नवीन नोटा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक पोस्ट आॅफिसमध्ये अद्याप नवीन नोटा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. छोट्या गावांतील पोस्ट आॅफिसमध्ये नागरिक हेलपाटे मारीत आहेत. मंचर शहरातील पोस्ट आॅफिसमध्ये १० लाख रुपयांची मागणी असताना आज केवळ एक लाख रुपये उपलब्ध झाल्याने कर्मचाऱ्यांनाच रोषाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने १००० व ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच पोस्ट आॅफिसमध्ये नोटा बदलून मिळतील, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. खेड्यापाड्यात असणाऱ्या पोस्ट कार्यालयात नवीन नोटा अद्याप उपलब्ध नाहीत. नागरिक मोठ्या संख्येने नोटा बदली करण्यासाठी येताहेत. मात्र, त्यांना केवळ हेलपाटे मारावे लागत आहेत. छोट्या गावात बँका नसल्याने त्यांना पोस्ट आॅफिस हा जवळचा पर्याय असतो. विशेषत: गृहिणी पोस्टात खाते काढून बचत करत असतात. ग्रामीण भागात अजूनही पोस्टामध्ये बचत, तसेच इतर व्यवहार करण्याचे प्रकार जास्त प्रमाणात होत आहेत. मंचर येथील पोस्टात नावाला थोडेसे पैसे येतात. पैशाची मागणी दररोज वाढत असताना कॅश येत नाही. आज १० लाख रुपयांची मागणी होती. मात्र, प्रत्यक्षात १ लाख रुपयेच आले. त्याचे वाटप करताना कर्मचाऱ्यांंना चांगलीच कसरत करावी लागली. पोस्ट रविवारी सुरू ठेवण्यात आले होते. पोस्टात तरी हक्काने पैसे मिळतील, असे नागरिकांना वाटले. मात्र, त्यांचा भ्रमनिरास होतो. आम्ही दररोज नव्या चलनाची मागणी करीत आहोत. उद्या जास्त रक्कम येण्याची शक्यता असल्याने शेलार यांनी सांगितले. (वार्ताहर)