शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

असला कारभारी नको ग बाई!

By admin | Updated: December 8, 2015 00:12 IST

भारतीय जनता पक्षासमवेत आम्ही सत्तेत आहोत पण आमची बांधिलकी जनतेशी आहे, असे सांगत राज्यात सत्तेची समान हिस्सेदार असूनही भाजपावर हल्लाबोल चढविणारी

पुणे : भारतीय जनता पक्षासमवेत आम्ही सत्तेत आहोत पण आमची बांधिलकी जनतेशी आहे, असे सांगत राज्यात सत्तेची समान हिस्सेदार असूनही भाजपावर हल्लाबोल चढविणारी शिवसेना अवघ्या वर्षभरावर आलेल्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुण्यातही आक्रमक झाली आहे. ऐन दिवाळीत वाढलेल्या तूरडाळीच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि महागाईच्या मद्ुद्यावरून शहर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या आठ आमदार आणि एका खासदाराचे वाभाडे काढण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून ऐन अधिवेशन काळात ‘असला कारभारी नको ग बाई’ ही मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी पक्षाकडून पुढील तीन दिवस संपूर्ण शहरात पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे गेल्या वर्षभरात महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न पुढे करीत भाजपावर हल्लाबोल केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूका २0१७ मध्ये होऊ घातल्या आहेत. त्या पूर्वी म्हणजेच मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे महापालिकेची तयारी म्हणून पाहिले जात होते. या विधानसभा निवडणुकीत गेली २५ वर्षे युतीत एकत्र असलेल्या भाजपा आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविली. या निवडणुकीत शिवसेनेला पुण्यातील हडपसर आणि कोथरूडची जागा गमवावी लागली. तर शहरातील आठही मतदार संघांमध्ये भाजपाचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.ऐन दिवाळीत महागलेल्या डाळींचे भांडवल करीत निम्हण यांनी शहरात सरकार विरोधी सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेत शहरातील आमदारांना चक्क खोंडाची उपमा देणारे फलक लावले आहेत. तर ‘असला कारभारी नको ग बाई’ या पथनाट्याच्या माध्यमातून थेट तूरडाळीच्या मुद्द्यावरून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची खिल्लीच उडविली आहे. त्यातच शिवसेनेकडून भाजपाविरोधी घेण्यात आलेला हा आक्रमक पवित्रा ऐन विधानसभेच्या तोंडावर घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत डाळींचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई न दिसलेल्या शिवसेनेला आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर दिसताच भाजपाचा नाकर्तेपणा दिसू लागल्याने शिवसेनेची ही महापालिका निवडणुकीचीच रंगीत तालीम सुरू असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)