शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

रिटायर्ड नव्हे, मी बिझी पर्सन - अनुपम खेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:13 IST

निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही, म्हणून अनेक जण काम करतो, असे सांगतात. पण वेळ घालवण्यासाठी काम केले जात नाही. ‘आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन, आय एम अ व्हेरी अ‍ॅक्टिव्ह पर्सन...’ अशा शब्दांत

पुणे : निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही, म्हणून अनेक जण काम करतो, असे सांगतात. पण वेळ घालवण्यासाठी काम केले जात नाही. ‘आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन, आय एम अ व्हेरी अ‍ॅक्टिव्ह पर्सन...’ अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपम खेर यांनी एफटीआयआयमध्ये कायमच सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले.एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अनुपम खेर यांनी अचानक संस्थेत ‘एंट्री’ करून प्रशासनासह विद्यार्थ्यांना धक्का दिला. मात्र एक दिवसापुरतेच न थांबता मंगळवारी (दि. १७) त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मास्टर क्लास’ घेतला.या अनुभवाविषयी ते म्हणाले, की चंदीगढ डिपार्टमेंट इंडियन थिएटरसारख्या संस्थेमधून जे काही शिकलो नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एफटीआयआयमध्ये काही काळ घालविला.शिक्षण घेतल्यानंतरही सहा महिने काम मिळविण्यासाठी रस्त्यावर भटकत होतो. आपल्याला काम मागणे किती गरजेचे आहे, त्यासाठी संघर्ष कसा करायचा, हे सांगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो. जीवनात जो काही अनुभव घेतला जे शिकलो ते आज शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना सांगताना नक्कीच आनंद होत आहे.आजवरचे जे अध्यक्ष झाले त्यांना संस्थेसाठी म्हणावा तेवढा वेळ देणे शक्य झाले नाही. तुम्ही कसा वेळ काढणार आहात? याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की मास्टर क्लास के बाद मैं आप से बातचीत कर रहा हूँ ना! आजोबा नेहमी म्हणायचे, व्यस्त असलेल्या माणसाकडेच कामासाठी नेहमी वेळ असतो. एखाद्या माणसाला काहीतरी करायची इच्छा असेल, तर तो काम शोधून काढतोच. मी ३३ वर्षांत ५८८ चित्रपट केले आहेत. देशविदेशात काम केले आहे. अध्यक्षपदी काम करताना मला विद्यार्थ्यांच्या थोडीच डोक्यावर बसायचे आहे. बाहेरच्या देशामधून मी जे काही शिकेन त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनाच होईल. आजकालच्या मुलांना पालक थोडीच शेजारी बसून हे करा, हे करू नका सांगतात.‘मास्टर क्लास’वर बहिष्कारएफटीआयआय प्रशासनाकडून अभ्यासक्रमांमधील जाचक नियमांच्या विरोधात २०१६ च्या बॅचमधील काही विद्यार्थ्यांनी ‘व्हिसडमट्री’ येथे बॅनर लावून आंदोलन सुरू केले आहे. पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रशासनाकडे विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचा पाढा वाचला आहे. मात्र प्रशासन ढीम्मच आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना ‘मास्टर क्लास’ला बसण्यासाठी विचारले असता विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यावर भाष्य करताना रंगमंचावर काम करताना समोर काही जागा रिकाम्या दिसतात. पण हे विद्यार्थी माझे आहेत, असे मी समजतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्याचा नक्की प्रयत्न करेन, असे खेर यांनी सांगितले.विद्यार्थ्यांबरोबर प्रशासनाने चर्चा केली आहे. त्यांच्या काही मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. अनुपम खेर यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एक मीटिंग झाली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हीही आशावादी आहोत.- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेर