शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये देशात सामान्य पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या मॉन्सूनमध्ये खंड पडला असला तरी जुलै महिन्यात देशभरात सर्वसाधारण (९४ ते १०६ टक्के) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या मॉन्सूनमध्ये खंड पडला असला तरी जुलै महिन्यात देशभरात सर्वसाधारण (९४ ते १०६ टक्के) पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील १० दिवसांत मॉन्सूनच्या पावसात फारशी वाढ होण्याची शक्यता नसून, ११ जुलैनंतर देशातील बहुतांश भागात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सूनने देशातील अनेक भागात नेहमीपेक्षा लवकर आगमन केले आहे. साधारणपणे मॉन्सून ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता असते. मात्र, आता दिल्लीसह राजस्थानमधील काही भागात अजूनही मॉन्सून पोहोचला नाही. येत्या १० जुलैपर्यंत त्यात प्रगती होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

महापात्रा यांनी सांगितले की, संपूर्ण देशाचा विचार करता देशभरात जून महिन्यात १० टक्के अधिक वर्षा झाली आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामानाने दक्षिण भारतात सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जुलै महिन्यांचा विचार करता संपूर्ण देशात जुलै महिन्यात ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.

मॉन्सूनच्या दृष्टीने पुढील १० दिवसांत अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढे वाटचाल होण्याची शक्यता कमी आहे. या काळात देशातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हिमालयीन पर्वतीय भाग, बिहार व ईशान्य भारतात चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचा विचार करता जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील दक्षिणेकडील भाग, तसेच मराठवाड्यातील तेलंगणालालागून असलेल्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील पूर्वकडील भागात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

---------