शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरणे गैर

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

जिल्ह्यात व शहरात नागरिक तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असताना महापालिकेच्या वतीने सिमेंट रस्ते व अन्य विकासकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे

पुणे : जिल्ह्यात व शहरात नागरिक तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असताना महापालिकेच्या वतीने सिमेंट रस्ते व अन्य विकासकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचा रस्त्यांच्या कामांसाठी वापर अत्यंत गैर असून, अशी बांधकामे त्वरित थांबवा, अशा स्पष्ट लेखी सचूना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत.सध्या राज्यासह पुणे जिल्ह्यातदेखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा विचार करता पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने केला तरच जूनअखेरपर्यंत किमान पिण्यासाठी पाणी पुरेल. असे असताना पुणे महापालिकेच्या वतीने सध्या मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तसेच अन्य विकासकामांसाठीदेखील पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राव यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये असलेले सर्व पाणी आता केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरुपाच्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे अत्यंत गैर आहे. एखाद्या विकासकामामुळे फार मोठी आडकाठी होणार नसेल तर अशी कामे त्वरित थांबवली पाहिजेत.‘सामूहिक होळी’, ‘रेन डान्स’वर बंदीजिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ रोजी साजऱ्या होणाऱ्या होळीनिमित्त आयोजित केले जाणारे रेन डान्स, सामूहिक होळी आयोजनावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी कोणत्याही स्वरुपात मान्यता देण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनीदेखील होळीनिमित्त पाण्याचा गैरवापर टाळून जास्तीत जास्त पाण्याची बचत करावी, असे आवाहन राव यांनी केले.