शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

मतदानाची रंगीत तालीम नाहीच

By admin | Updated: July 13, 2016 00:55 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानासाठी किती वेळ लागेल, केंद्र वाढवावी लागतील किंवा नाही याचा अंदाज घेण्यास महापालिकेच्या निवडणूक शाखेने अद्याप सुरुवात केलेली नाही.

पुणे : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानासाठी किती वेळ लागेल, केंद्र वाढवावी लागतील किंवा नाही याचा अंदाज घेण्यास महापालिकेच्या निवडणूक शाखेने अद्याप सुरुवात केलेली नाही. पालिकेची या वेळची सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे होणार आहे. त्यामुळे एका मतदाराला चार मतं द्यावी लागणार आहेत. त्यातून मतदान प्रक्रियेस नेहमीपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता गृहीत धरून आयोगाने महापालिकेला त्याची रंगीत तालीम घेऊन एकूण मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागेल किंवा कसे याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. पालिकेकडून अद्याप असा अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत नाही.पालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, की एका मतदान केंद्रावर किमान ७०० व कमाल ९०० मतदार असतात. सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही मतदानाची वेळ असते. इतक्या वेळात या मतदारांचे मतदान पूर्ण होणार आहे किंवा नाही, हे काही मतदारांना प्रत्यक्ष मतदान करायला लावून पाहिले जाईल. त्यानंतरच मतदान केंद्र वाढवावी किंवा नाही याचा अंदाज येईल. अद्याप हे काम सुरू केलेले नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)