लासुर्णे : पल्स पोलिओ लसीकरण १९९५ पासून यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात १९९९ पासून एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. ही स्थिती कायम ठेवण्यासाठी १७ जानेवारी व २१ फेबु्रवारीच्या मोहिमेत ० ते ५ वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित ठेवू नये, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. लासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुकास्तरीय पोलिओ लसीकरणचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भरणे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, लासुर्ण्याच्या सरपंच निर्मला चव्हाण, जाचकवस्तीच्या सरपंच ज्योती काळे, ‘छत्रपती’चे संचालक अमोल पाटील, विजय निंबाळकर, गजानन वाकसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना डॉ. महाजन म्हणाले, तालुक्यात ३७ हजार ८०७ लाभार्थी बालके आहेत. यासाठी तालुक्यात ३६७ बूथ नेमले आहेत. यामध्ये ९०६ कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्यावर नियंत्राणासाठी ७४ पर्यवेक्षक नेमले आहेत. टोलनाके, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, ऊसतोडणी कामगारांची मुले यांनादेखील पोलिओ लस देण्याची सोय केली आहे.
‘इंदापुरात एकही पोलिओ रुग्ण नाही’
By admin | Updated: January 19, 2016 01:48 IST