शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुण्यात पहिली पसंती कोणालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातील वैध व अवैध मते निश्चित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातील वैध व अवैध मते निश्चित करण्याचेच काम रात्री दहापर्यंत संपले नव्हते. वैध-अवैध मते निश्चित करतानाच पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात होती. मात्र यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना महाआघाडी किंवा भारतीय जनता पक्ष या दोन्हीसह कोणत्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मतमोजणीस विलंब लागणार असून ‘पदवीधर’चा निकाल शुक्रवारचा दिवस उजाडल्यानंतरही लागेल की नाही या बद्दल साशंकता आहे. ‘शिक्षक’चा निकालही मध्यरात्रीनंतर खूप उशिरा लागण्याची चिन्हे आहेत.

वैध आणि अवैध मतांची विभागणी करताना मात्र दोन्ही मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याचे दिसत होते. पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. ३) पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीत सुरू झाली.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या पसंतीचे मत दिलेल्या मतपत्रिकांची निवड करण्यात आली. पदवीधर मतदार संघात ११२ टेबल लावण्यात आले. एका टेबलवर बावीसशे मतपत्रिका देण्यात आल्या असून रात्री नऊपर्यंत प्रत्येक टेबलवर सुमारे ८०० ते ९०० मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यानंतरही काही टेबलवर मतपत्रिका वैध, अवैध व पहिला पसंती क्रमांक ठरवणे शिल्लक आहे.

----------

चौकट

शिक्षक मतदार संघात महाआघाडी आघाडीवर

शिक्षक मतदार संघातील ७०-८० टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. यात महा विकास आघाडीचे जयंत आसगावकर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पुढे असून, माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनी देखील चांगली मते घेतली आहेत. तसेच मते बाद होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेमध्ये वैध मतांची संख्या निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवारासाठी कोठा निश्चिती केली जाईल. शिक्षक मतदारसंघांमध्ये 52978 मतदान झाले त्यामध्ये सुमारे तीन ते चार टक्के मतपत्रिका अवैध ठरण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे सुमारे 50 हजार वैध मतांची संख्या लक्षात घेता शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची 25 हजार पेक्षा अधिक मते मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे. मध्यरात्रीपर्यंत कोठा निश्चिती होईल. यात पहिल्या पसंतीचा आसगावकर यांनी 25 हजारांचा कोटा पूर्ण केल्यास विजय घोषित केला जाऊ शकतो.

--------