शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर-शिक्षक मतदारसंघात पहिली पसंती कोणालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातील वैध व अवैध मते निश्चित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातील वैध व अवैध मते निश्चित करण्याचेच काम रात्री दहापर्यंत संपले नव्हते. वैध-अवैध मते निश्चित करतानाच पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात होती. मात्र यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना महाआघाडी किंवा भारतीय जनता पक्ष या दोन्हीसह कोणत्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मतमोजणीस विलंब लागणार असून ‘पदवीधर’चा निकाल शुक्रवारचा दिवस उजाडल्यानंतरही लागेल की नाही या बद्दल साशंकता आहे. ‘शिक्षक’चा निकालही मध्यरात्रीनंतर खूप उशीरा लागण्याची चिन्हे आहेत.

वैध आणि अवैध मतांची विभागणी करताना मात्र दोन्ही मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याचे दिसत होते. पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. ३) पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीत सुरू झाली.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या पसंतीचे मत दिलेल्या मतपत्रिकांची निवड करण्यात आली. पदवीधर मतदार संघात ११२ टेबल लावण्यात आले. एका टेबलवर बावीसशे मतपत्रिका देण्यात आल्या असून रात्री नऊपर्यंत प्रत्येक टेबलवर सुमारे ८०० ते ९०० मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यानंतरही काही टेबलवर मतपत्रिका वैध, अवैध व पहिला पसंती क्रमांक ठरवणे शिल्लक आहे.

----------

चौकट

शिक्षक मतदार संघात महाआघाडी आघाडीवर

शिक्षक मतदार संघातील ७०-८० टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्ण होत आली. यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पुढे असल्याचा कल दिसून आला. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनी देखील चांगली मते घेतली आहेत. मते बाद होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.

चौकट

कोटा निश्चित होण्यास उशीर

पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेमध्ये वैध मतांची संख्या निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या मतांचा ‘कोटा’ निश्चित होणार आहे. शिक्षक मतदारसंघांत ५२ हजार ९७८ मतदान झाले. यात अवैध मतांची संख्या सुमारे तीन ते चार टक्के आहे. त्यामुळे सुमारे ५० हजार वैध मतांची संख्या लक्षात घेता शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र कोटा निश्चित होण्यास मध्यरात्र उजाडली.

चौकट

शिक्षक, पदवीधरांचे मतदान ‘चुकले’

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदान करताना सुमारे तीन ते चार टक्के मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने बाद ठरल्या. माध्यमिक शिक्षक, पदवीधर मतदार असूनही या मतदारांनी मतदान करताना पसंतीक्रम लिहिण्याऐवजी उमेदवाराचा अनुक्रमांक मतपत्रिकेवर टाकला आहे. मतदानासाठी आयोगाने दिलेला पेन वापरण्याऐवजी स्वतःच्या पेनाचा वापर केला. पसंती क्रमांकाऐवजी बरोबरची खूण केली. मतपत्रिकेतील मोकळ्या रकान्यात पसंती क्रमांक लिहिण्याऐवजी उमेदवाराच्या नावावरच क्रमांक लिहिणे, एकच क्रमांक अनेक जणांना देणे अशा अनेक चुका केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानात तीन टक्के शिक्षक, पदवीधर नापास झाले आहेत.