शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून नाही नवीन रेल्वेमार्ग

By admin | Updated: February 2, 2017 03:55 IST

मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र अंदाजपत्रक असलेली रेल्वे यंदाच्या अंदाजपत्रकातून घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही ठळक बाबी वगळता

पुणे/पिंपरी : मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र अंदाजपत्रक असलेली रेल्वे यंदाच्या अंदाजपत्रकातून घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही ठळक बाबी वगळता रेल्वेबाबत फारशा काही घोषणा केल्या नाहीत. सर्वसामान्य प्रवाशांना अपेक्षित असलेल्या नवीन गाड्या, प्रकल्प, नवीन मार्ग अशा मुद्यांचा उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनही याबाबत अनभिज्ञ असून, सविस्तर माहिती मिळण्यास किमान एक-दोन दिवसांचा कालावधी लागेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून, दररोज सुमारे साडे तीन कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक दरवर्षी सादर केले जात होते. यंदापासून स्वतंत्र अंदाजपत्रक बंद करण्यात आले आहे. पूर्वी रेल्वे अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित मार्ग, नवीन गाड्या, योजना, प्रकल्प, स्थानकांची सुधारणा, सुरक्षा यांसह विविध पायाभूत सुविधांचा उल्लेख ठळकपणे केला जात असे. त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चाही होत होती. प्रत्येक रेल्वे प्रवाशाला अंदाजपत्रकाची उत्सुकता असायची. मंगळवारी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये यापैकी कोणतीही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. जेटली यांनी रेल्वेबाबत काही ठळक घोषणा केल्या असल्या, तरी त्यामध्ये नव्या गाड्या, मार्गांचा समावेश नाही. याबाबत रेल्वे प्रशासनही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवासी, संघटनांकडून प्रशासनाकडे याबाबत विचारणा होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र, दिल्लीकडे डोळे लावून बसले होते. दिवसभरात केवळ मुख्य तरतुदींची माहिती देण्यात आली. याबाबत प्रवाशांसह संघटनांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. जेटली यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकातून काहीही बोध होत नाही.केवळ ठळक घोषणा करून रेल्वेची बोळवण करण्यात आली आहे. किमान अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर रेल्वेकडून सविस्तर माहिती प्रवाशांसाठी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. एकीकडे रेल्वेची स्वायत्तता अबाधित राखण्याची घोषणा होत असताना त्यामध्ये पारदर्शकता दिसत नाही, अशी नाराजी रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)रेल्वेबाबत नवीन अर्थसंकल्प तयार झाला आहे. त्यात स्वच्छ रेलबाबत घोषणा केली आहे. सरकारने तिसऱ्याा रेल्वेमार्गाची घोषणा केली होती, पण अजूनही काम सुरू केले नाही. मेट्रो प्रकल्पदेखील पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर तयार होत आहे. त्यामुळे निगडी, आकुर्डी, चिंचवड भागातील नागरिक या सुविधेपासून वंचित राहत आहेत. ई-तिकीटमध्ये सवलत देण्यापेक्षा रेल्वे स्थानकावर जादा तिकीट घर करून पदवीधरांना नोकरी द्यावी. - गुलामअली भालदार, चिंचवड प्रवासी संघ