शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे निवडणूक आली तर जनता काय करेल ते सांगायची गरज नाही: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 19:10 IST

जुन्नर येथून पुणेकडे जाताना पवार यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मंचर:सत्ता येथे जाते सत्तेला चिकटून राहण्याची भूमिका घेतली तर लोक निकाल लावतात. ज्यांनी निवडून दिलं त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे यापुढे निवडणूक आली तर जनता काय करेल ते सांगायची गरज नाही. अशी टिप्पणी खासदार शरद पवार यांनी केली.

जुन्नर येथून पुणेकडे जाताना पवार यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.ते म्हणाले आंबेगाव तालुक्यात मी यावे म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह होता.अनेक वर्ष राजकारणात असताना लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने राज्यात वेगळे राजकारण झाले. सत्ता येथे जाते, त्या सत्तेला चिकटून राहायचे नसते.तुम्ही चिकटून राहण्याची भूमिका घेतली तर लोक निकाल लावतात असे सांगून पवार म्हणाले महाराष्ट्रात आता वेगळे राजकारण झाले आहे. ज्यांची तुम्ही मते घेतली ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्या जनतेचा तुम्ही विचार केला नाही. ही जनतेची फसवणूक आहे. लोकांना संधी मिळेल त्यावेळेस ते योग्य निकाल लावतील. वर्ष दीड वर्षात निवडणुका होणार असून त्यावेळेस संधी मिळाल्यानंतर तुम्ही काय कराल ते सांगायची गरज नाही असा टोला पवार यांनी लगावला. आंबेगाव तालुक्यात जाहीर सभा घेणार असून त्यावेळी सविस्तर बोलू असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम आदी होते. निकम यांनी प्रास्ताविक करताना जुन्नर येथील कार्यक्रमात पवार यांना विनंती केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतल्याबद्दल आभार मानले. बाजार समितीच्या वतीने सभापती वसंतराव भालेराव, संचालक निलेश थोरात, लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, सुहास बाणखेले, बाजीराव मोरडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, दत्ता थोरात ,सुरेश आण्णा निघोट ,बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, आदींनी स्वागत केले.पूर्वनियोजित कार्यक्रम नसतानाही दुपारी उशिरा शरद पवार येणार असल्याचे समजूनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी झालेली रेटा-रेटी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. विशेष म्हणजे शरद पवार गटाबरोबरच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्ते स्वागतासाठी हजर होते. गर्दी असूनही पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार