शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मंडे ठरला ‘नो मनी डे’

By admin | Updated: November 15, 2016 03:57 IST

देशभरात सोमवारी (दि. १४) ‘चिल्ड्रेन्स डे’, अर्थात ‘बाल दिन’ साजरा केला जात असताना शहरात मात्र बहुतांश बँकांनी एटीएम बंद ठेवून ‘

पुणे : देशभरात सोमवारी (दि. १४) ‘चिल्ड्रेन्स डे’, अर्थात ‘बाल दिन’ साजरा केला जात असताना शहरात मात्र बहुतांश बँकांनी एटीएम बंद ठेवून ‘नो मनी डे’ साजरा केला. त्यामुळे नव्या चलनी नोटा मिळविण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल झाले. परिणामी, तुरळक ठिकाणी सुरू असलेल्या एटीएम केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत होती. गेल्या बुधवारपासून (दि. ९) एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यानंतर शनिवारी व रविवारी सर्वच बँकांनी आपल्या शाखा सुरू ठेवून जुन्या नोटा बदलून दिल्या. टपाल कार्यालयातूनदेखील नोटा बदलून देण्याची अथवा खात्यात पैसे भरण्याची मुभा होती. यादरम्यान अनेक बँकांची एटीएमदेखील सुरू होती. काही ठिकाणी पैसे लवकर संपल्याच्या अथवा एटीएम केंद्रच बंद असल्याच्या घटना समोर आल्या. तर, काही ठिकाणी नवीन दोन हजारांची नोट तांत्रिक अडचणींमुळे यंत्राबेहर येत नव्हती. अशा गैरसोयींचा सामना नागरिकांना करावा लागला. यादरम्यान, अनेक ठिकाणची एटीएम केंद्र सुरू असल्याने नागरिकांना पैसे काढता आले. त्यामुळे रविवारी रात्री साडेअकरा-बारापर्यंतदेखील काही एटीएम केंद्रांवर गर्दी दिसत होती.मात्र, सोमवारी (दि. १४) गुरू नानक जयंतीनिमित्त बँकांना सुटी असल्याने शहरातील सर्वच बँका बंद होत्या. त्यामुळे साहजिकच एटीएम केंद्रांकडे नागरिकांची पावले वळाली. शहरातील बहुतांश बँकांची एटीएम केंद्रांची शटर बंद होती. तर, काही एटीएम केंद्रांबाहेर एटीएम बंद असल्याचा अथवा पैसे नसल्याचा फलक लावण्यात आला होता. शहरातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच एटीएम सुरू होती. तेथे पैसे काढण्यास गर्दी नागरिकांची उसळली होती. (प्रतिनिधी)