शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारीवर ‘नो केन’चे संकट

By admin | Updated: January 5, 2017 03:30 IST

ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जेमतेम २ महिने झाले असताना जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यावर ‘नो केन’ म्हणजे गाळपासाठी अपुऱ्या उसाचे संकट ओढवले आहे.

केडगाव : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जेमतेम २ महिने झाले असताना जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यावर ‘नो केन’ म्हणजे गाळपासाठी अपुऱ्या उसाचे संकट ओढवले आहे.नो केन संकटामुळे नववर्षाच्या सुरुवातीस नीरा भीमा, व्यंकटेश व अनुराज हे कारखाने बंद झाले आहेत. काही कारखाने पुरेशा उसाअभावी दिवसभरातील बहुतांशी तास बंद राहत आहेत. गेल्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी ऊसपिक जळाले होते. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांनी कोवळ्या उसाचे पाणीटंचाईमुळे गाळप केले. त्यामुळे या गळीत हंगामावर ऊसटंचाईचे सावट होते. भरीस भर राज्यसरकारने या वर्षी गळीत हंगाम उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे असताना जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीस गळीत हंगाम सुरू झाला. अपुऱ्या उसाअभावी साखर कारखानदारांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील उसांची पळवापळवी सुरू केली. चांगल्या ऊसदराचे आमिष दाखवून बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांच्या टोळ्या पुणे जिल्ह्यात दाखल झाल्या. परंतु पुरेशा उसाअभावी जेमतेम ५० ते ६० दिवसांच्या हंगामानंतर कारखाने बंद झाले आहेत. याशिवाय कारखान्याचा सरासरी २५०० रुपये पहिला हप्ता किंवा बाजारभाव असताना स्थानिक गुऱ्हाळे प्रतिटन ३००० रुपये देऊन कारखान्यांशी स्पर्धा करीत आहेत. गुऱ्हाळ असणाऱ्या परिसरात काही ठिकाणी कृत्रिम ऊसटंचाई जाणवत आहे. प्रतिवर्षी सरासरी १५० दिवस चालणारा गळीत हंगाम यावर्षी ६० दिवसांत घरघरीस लागला आहे. सध्या जिल्ह्यातील बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर्स, इंदापूर, नाथ म्हस्कोबा हे कारखाने सरासरी गाळप क्षमतेच्या निम्मेच गाळप करत असल्याने आठवड्याभरात ते कारखाने बंद होतील, असा अंदाज आहे. भीमा पाटस प्रशासनाने पुरेशा उसाअभावी कारखाना सुरू केला नाही, तर राजगड कारखान्याने अवघे ५७ हजार टन गाळप झाले आहे. जिल्ह्यामध्ये अंबालिका, सोमेश्वर, दौंड शुगर्स व इंदापूर कारखान्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ३ लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. बाकीचे कारखाने २ लाख टनाच्या आतच गाळप केलेले आहेत. सोमेश्वर कारखान्याने सर्वाधिक ११.१६ उच्चांकी साखर उतारा मिळवला आहे, तर नीरा भीमा कारखान्याचा उतारा नीचांकी ९.४७ घसरला आहे. त्यामुळे यावर्षी चांगला बाजारभाव मिळाला तरी एकरी सरासरी उत्पन्न घटले आहे.