शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जीएसटीचे स्तोम नको - अभय टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 03:07 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व काही सुटसुटीत आणि सुरळीत होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होऊन आणि सर्व अडचणी दूर होतील, असे प्रचंड वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रणालीचे फायदे-तोटे समजण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल.

पुणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व काही सुटसुटीत आणि सुरळीत होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होऊन आणि सर्व अडचणी दूर होतील, असे प्रचंड वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रणालीचे फायदे-तोटे समजण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. या कायद्याने महागाई कमी होईल, याचे उत्तर, नाही असेच द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी गुरुवारी येथे दिली.मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने आयोजित ‘जीएसटी : काही अनुत्तरीत प्रश्न’ या विषयावर ते बोलत होते. केंद्रीय जीएसटीच्या उपायुक्त राजलक्ष्मी कदम, प्रतिष्ठानचे पुणे केंद्राचे अध्यक्ष अंकुश काकडे, दत्ता बाळसराफ, सीए प्रकाश झावरे-पाटील, वृषाली लोढा या वेळी उपस्थित होत्या. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला.टिळक म्हणाले, सध्या कायद्याचा संक्रमण काळ आहे. त्यामुळे तो, राबविताना अनेक अडचणी येतील. मात्र, यातील फायदे आणि तोटे समजण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल. या करामुळे महागाई कमी होईल, की नाही हे देखील निश्चित सांगता येत नाही. कारण, धान्याच्या किमती, इंधन, गॅस अणि वीज यावर महागाईचा निर्देशांक अवलंबून असतो. जवळपास ८० टक्के इंधन आपल्याला आयात करावे लागते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर टिकून असल्याने महागाई निर्देशांकात फारसा बदल दिसत नाही.सरकारला विकासासाठी महसूलाची गरज असते. सातत्याने कराच्या दरात वाढ करणे शक्य होत नाही. त्या ऐवजी करदात्यांच्या संख्येत वाढ केल्यास, कर संकलनही वाढेल. त्याच दृष्टिकोनातून जीएसटीची रचना करण्यात आली असल्याचे वाटते, असेही टिळक यांनी या वेळी स्पष्ट केले.वस्तूवरील छापील किमतीवर जीएसटी आकारला जातो. जीएसटीसह हा छापील दर असतो. त्यामुळे त्या प्रमाणात रकमेचे वर्गीकरण विक्रेत्यांनी केले पाहिजे, असे झावरे-पाटील म्हणाले.जीएसटी प्रणाली अत्यंत सुटसुटीत करण्यात आली आहे. संपूर्ण प्रणाली संगणकीकृत असल्याने व्यापाºयांचा अधिकाºयांशी कमीत कमी संपर्क येईल. या मुळे अधिक पारदर्शकता येणार असून, ग्राहकांना देखील आपण कोणत्या वस्तू आणि सेवांवर किती कर भरला हे समजू शकेल.- राजलक्ष्मी कदम,उपायुक्त, केंद्रीय जीएसटीच्या