शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खेड पंचायत समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे ८ सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून १४ पैकी ...

खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे ८ सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. सभापतिपद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव आहे. शिवसेनेला पद न मिळालेल्या सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे. सदस्यांमध्ये आपसात ठरल्याप्रमाणे सर्वांना संधी मिळाली पाहिजे, असा दावा इच्छुकांनी बोलून दाखवला. त्यासाठीच हा अविश्वास दाखल केला आहे, असे सांगितले. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला ९ महिने बाकी असल्याने पद मिळवण्याची शर्यत व चुरस निर्माण झाली आहे. मागील सभापती, उपसभापती निवडणुकांमध्ये सुध्दा शिवसेनेत मतभेद असल्याचे पाहायला मिळाले. सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांची मदत घेऊन काहींनी पदाची माळ गळ्यात मारून घेतली. शिवसेनेच्या सभागृहातील सदस्यांवर पक्षीय नेत्यांचा वचक राहिलेला नसल्याचे यावरून बोलले जाते. समितीतील सर्व पक्षीय १४ पैकी ११ सदस्यांनी व शिवसेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याचे सांगितले जात असून यामध्ये राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांचा सहभाग आहे. सभापतिपदाच्या इच्छुक सुनीता सांडभोर यांनी हा ठराव प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, गटविकास अधिकारी अर्...........ज दाखल केल्याचे सांगितले. तर सेनेचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे आपण यापूर्वीच राजीनामा दिला आहे, असे सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले. .........

चौकट

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अनेकजण उपचार घेत आहेत. अनेकांचा बळी गेला आहे. तिसऱ्या लाटेचे संकट डोक्यावर घोंगावत आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर आले. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांचे रोजगार बुडाले. व्यवसाय थांबले. तालुक्यातील अनेक गावे, वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई आहे. हे सारे बाजूला ठेवून पदासाठी पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांनी संगीत खुर्चीचा खेळ सुरु केल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे.