शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला भुरट्या चोऱ्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 04:08 IST

एकीकडे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव तसेच शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामांच्या साहित्यांची राजरोस चोरी, तसेच पालिकेच्या विविध विभागांमधील

पुणे : एकीकडे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव तसेच शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामांच्या साहित्यांची राजरोस चोरी, तसेच पालिकेच्या विविध विभागांमधील साहित्यांच्या चोरीचे ग्रहण गेल्या काही वर्षांत महापालिकेला लागले आहे. विशेष म्हणजे, दर वर्षी गटाराच्या झाकणांपासून पुलाच्या सुशोभीकरणासाठी लावलेली रेलिंग आणि चक्क बसथांबेही चोरी होत असताना, या प्रकाराची दखल घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे ना कोणता विभाग आहे, ना चोरी झालेले साहित्य काय होते, याची दखल घेणारी यंत्रणा; त्यामुळे एकीकडे नागरिक कर भरतात, तर दुसरीकडे हा जमा झालेला कर सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च केला जातो व तिसरीकडे या मालमत्तेवर भुरटे चोर हात साफ करतात. याला महापालिका प्रशासन कधी आळा घालणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महापालिकेकडून शहरात दर वर्षी नवीन विकासकामे तसेच देखभाल-दुरुस्तीची जवळपास हजार कोटींची कामे केली जातात. मात्र, ही कामे एकदा केल्यानंतर त्याचे पुढे काय झाले? करण्यात आलेले काम व्यवस्थित आहे का? त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची काय स्थिती आहे? याची कोणतीही पाहणी करणारी यंत्रणा महापालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे एकाच कामावर वारंवार खर्च करण्याचे प्रकार महापालिकेला नवीन नाहीत. मात्र, पालिकेकडून शुभोभीकरण करण्यात आलेल्या तसेच देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली शहरात बदलण्यात आलेल्या साहित्यांच्या चोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेष म्हणजे, हे प्रकार डोळ्यासमोर असतानाही प्रशासनाकडून त्याकडे साधे ढुंकून पाहण्याची तसदीही घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही बाब लोकमतकडून शहरात करण्यात आलेल्या काही प्रातिनिधिक कामांच्या पाहणीत दिसून आली आहे. शिवाजी पूल (महापालिका भवनासमोर) शहरातील ब्रिटिशकालीन पूल असलेला पालिका भवनाच्या परिसरातील शिवाजी पूल हा गेल्या काही वर्षांत भुरट्या चोरांसाठी कुरणच बनले आहे. ऐतिहासिक पूल असल्याने महापालिकेकडून दर वर्षी या पुलावरील पदपथावर तत्कालीन स्वरूपाचे लोखंडी रेलिंग बसविण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत तीन वेळा या ठिकाणी वेगवेगळी रेलिंग बसविण्यात आली आहेत. मात्र, प्रत्येक वेळी भुरट्या चोरांकडून त्यावर हात साफ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी लावण्यात आलेले पथदिव्यांचे खांबही आधी धक्के मारून खाली पाडले जातात. त्यानंतर ते रात्रीच्या अंधारात पसार केले जातात. तीन लाखांच्या बसथांब्यांचे उरले सांगाडे (सिंहगड रस्ता) शहरात महापालिकेकडून तसेच पीएमपीकडून लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव तब्बल तीन लाख रुपयांचा एक असे स्टेनलेस स्टीलचे बसथांबे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यावरही चोरट्यांनी हात साफ केला आहे. एवढेच काय, तर बीआरटी मार्गावर उभारलेले बसथांब्यांच्या खुर्च्या तसेच पत्रेही पळविण्यात आले आहेत. या बसथांब्यांच्या मागील बाजूला असलेले अ‍ॅल्युमियम शीट तसेच पुढील रेलिंगला असलेली स्टीलची जाळी चोरट्यांनी गायब केलेली आहे. यशवंतराव चव्हाण भुयारी मार्ग (संचेती हॉस्पिटलसमोर)संचेती रुग्णालय परिसरात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून येथे भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गात प्रशासनाकडून सुभोभीकरणासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या टाइल लावण्यात आल्या आहेत. अतिशय महागड्या असलेल्या या टाइल स्क्रू आणि लोखंडी पट्ट्याच्या साह्याने बसविण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात या टाइल एक-एक करून चोरीला जात आहेत. सुरुवातीला या टाइलचे स्क्रू ढिले केले जातात. त्यानंतर ते सतत ओढले जातात. त्यानंतर त्या ढिल्ल्या पडताच रात्रीच्या अंधारात काढून घेऊन चोरटे पसार होत असल्याचे या ठिकाणी दिसून येते. या विभागांना चोऱ्यांचे ग्रहणपाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, डे्रणेज विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, हेरीटेज विभाग, पथ विभाग, वाहतूक नियोजन विभाग, अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग, भवन विभाग.