पिंपरी : ‘पिंपरी चिंचवड रनॅथॉन’ या मॅरेथॉन स्पर्धेत अंकित मलिक याने २१ किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन जिंकत पुरुष गटात प्रथम क्रमांक मिळविला. सुनील पवार दुसऱ्या स्थानावर आणि शानदार सिंग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महिलांच्या १० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रोहिणी राऊत हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. रोटरी क्लब आॅफ निगडी च्या वतीने स्पर्धा निगडी येथे रविवारी सकाळी उत्साहात पार पडली. विविध गटांत ९ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन फरांदे स्पेसेसचे संचालक अनिल फरांदे यांच्या हस्ते झाले. या वेळी रोटरी क्लबचे प्रांतपाल विवेक अरहाना, माजी प्रांतपाल प्रमोत जेजुरीकर, विनोद देशपांडे, मुकुंद अत्रे, सुनील अत्रे, सुनील दोशी, निगडी क्लबचे अध्यक्ष शेखर झिलपेलवार, भारती झिलपेलवार, डॉ. शुभांगी कोठारी, राणू सिंघानिया, जगमोहन भुर्जी, हरबिंदरसिंग दुल्लत, विजय काळभोर आदी उपस्थित होते. विजेत्यांना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड व सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे यांच्या हस्ते रोख रकम व स्मृतीचिन्ह बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी पराग सातपुते, डॉ. उज्जैन भट्टाचार्य, प्रसाद जोशी, श्रीरंग सावंगीकर, गजानन कुलकर्णी, सहदेव मेहता आदी उपस्थित होते. निकाल : पुरुष गट (२१ किलोमीटर) : अंकीत मलिक, सुनील पवार, शानदार सिंग. महिला (१० कि.मी.) : रोहिणी राऊत, पुजा वराडे, प्रियंका चावसर, सुखमती गायकवाड. १६ वर्षांवरील मुले : (४ कि.मी.) : सिद्धेश्वर सुरवडकर, दीपक कुमार, गुरमीत सिंग. मुली: (४ कि.मी.) : प्रियंका परेल, संपदा बुचडे, कविता राठोड. १६ वर्षांखालील मुले (३ कि.मी.) : दीपक सुंबडा, अनुराग शर्मा, राहुल सूर्यवंशी. मुली : (३ कि.मी.) : प्रीती चव्हाण, अल्का गायकवाड, निकीता हजारे. ज्येष्ठ नागरिक गट : (२ कि.मी.) : सुभाष जोशी, हरिश्चंद्र यतीन, विनोद शेठ. (प्रतिनिधी)
उत्साहात दौडले नऊ हजार स्पर्धक
By admin | Updated: January 12, 2015 02:23 IST