शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार दाम्पत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 07:30 IST

चाकण नगर परिषदेच्या सफाई कामगारास मानसिक छळ देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह एकूण नऊ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकण : येथील चाकण नगर परिषदेच्या सफाई कामगारास मानसिक छळ देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह एकूण नऊ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार सी. एम. गवारी यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी सकाळी सहा वाजता अनिल चिमाजी धोत्रे ( वय ४६, रा. खंडोबा माळ, चाकण ) हा सफाई कामगार वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असताना मृत झाला. त्यांची पत्नी शांताबाई अनिल धोत्रे यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या दाम्पत्याने १२ जून रोजी मानसिक छळाला कंटाळून फोरसन कीटक नाशक हे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांचा मुलगा अविनाश अनिल धोत्रे ( वय २२, रा. खंडोबा माळ, चाकण ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चाकण नगरपरिषदेचे कर्मचारी विजय भोसले, मंगल गायकवाड, संगीता घोगरे ( सर्व रा. आंबेडकरनगर, चाकण ) तसेच फिर्यादीची पत्नी कोमल, सासरा शाम बाबू मंजुळे, सासू सुनीता, चुलत सासरा रमेश बाबू मंजुळे, चुलत सासू छाया, मेव्हुणा राजू ( सर्व रा. पनवेल, जि.रायगड ) असा एकूण नऊ जणांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६८/१८, भादंवि कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश धोत्रेने दिलेल्या फिर्यादीवरून याबाबतची अधिक माहिती अशी की, शांताबाई व अनिल हे दोघे चाकण नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करीत असे. फिर्यादी अविनाशचे ११/१२/२०१६ रोजी पनवेल येथील कोमल हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोनच महिन्यात कोमलने घरात सतत भांडण करून, शिवीगाळ करून माहेरी निघून गेली. तिला आणण्यासाठी गेले असता कोमल व नातेवाईकांनी भांडण केले. तसेच अविनाशची पत्नी कोमल हिने हुंड्यासाठी छळ केल्याबाबतचा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोटगीसाठी पनवेल कोर्टात केस टाकून वकिलाकडून नोटीस देऊन दहा लाखाची मागणी केली होती. कोमल व कुटुंबीयांनी कोर्टात व घरी वेळोवेळी अविनाश व त्याच्या आई वडिलांचा अपमान केला होता. आर्थिक परिस्थिती हलाकीची असताना त्यांचा मानसिक छळ होत होता. त्यांनी मागितलेल्या भरपाई ते दाम्पत्य कायम टेन्शनमध्ये होते.त्यातच चाकण नगर परिषदेत काम करीत असलेल्या ठिकाणी मुकादम विजय भोसले, मंगल गायकवाड हे नेहमी कामगारांसमोर अपमानास्पद वागणूक देत होते. संगीता घोगरे ह्या सुपरवायझर ला चुगल्या लावून चेष्टा करीत होती. काम नीट करीत नसलेबाबत त्यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. तर विजय भोसले याने अविनाशच्या आई-वडिलांचे पगार थांबवले होते. फिर्यादीची पत्नी कोमल, त्यांचे कुटुंबीय व नगर परिषदेचे कामगार यांच्या मानसिक छळाला कंटाळून या दाम्पत्याने १२ जून रोजी विषारी औषध प्राशन केले. यामध्ये उपचार चाकू असताना वडील अनिल यांचा मृत्यू झाल्याने वरील नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करीत आहेत.