शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ध्वज फडकवल्याने नऊ महिन्यांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:04 IST

इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती.

निरवांगी : इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. दंड न भरण्यास नकार दिल्यामुळे माझ्या घरातील साहित्य जप्त करण्यात आले होते व त्याचा लिलाव करून दंड वसूल केला, असे भारत छोडो आंदोलनात इंग्रजांविरोधात सत्याग्रह केलेले स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी यांनी सांगितले.कळंब (ता. इंदापूर) येथे ‘भारत छोडो आंदोलनात माझे योगदान’ या विषयावर इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी प्रास्ताविक केले.इतिहास विभागाचेप्रमुख प्राध्यापक हमीद उमरअली काझी यांनी स्वतंत्र सैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरूजी यांचा परिचय करून दिला.या वेळी माने गुरूजी यांनी इंग्रज राजवटीत आलेले अनुभव सांगितले. हे अनुभव कथन करताना ते अत्यंत भावुक झाले होते. त्याने उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणारे अनुभव होते.या वेळी प्रा. ज्ञानेश्वर गुळीक व विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीत सादर महाविद्यालयच्या वतीने माने गुरुजी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, खजिनदार हणमंतराव रणसिग, विश्वस्त शिवाजी रणवरे, प्रकाश कदम, वीरसिंह रणसिग, कुलदीप हेगडे कार्यालय अधिक्षक शिवाजी कदम महाविद्यालय प्राध्यापक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्रा. हमीद उमरअली काझी व ज्ञानेश्वर गुळीक, विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.देशावर निष्ठा ठेवा; सौजन्याने वागा...आपल्या दैनंदिन कार्याची नोंद ठेवा. कर्ज काढू नका, आपल्या देशावर निष्ठा ठेवा, इतरांशी सौजन्याने वागा, असा संदेश माने गुरुजींनी दिला. भारतमाता की जय, ही घोषणा त्यांनी स्पष्ट व खड्या आवाजात दिली. तेव्हा त्यांना उपस्थितांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सभागृह दणाणले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वीरसिंह रणसिंग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.