शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजी प्रकल्पासाठी नऊ ठिकाणी जागा

By admin | Updated: January 11, 2017 03:57 IST

महापालिकेच्या ९ जागांवर सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी जागा देण्यास मंगळवारी स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली.

पुणे : महापालिकेच्या ९ जागांवर सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी जागा देण्यास मंगळवारी स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली. यामुळे सीएनजीवरील वाहनांना सीएनजीचा सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत पुणे शहर परिसरात सीएनजी गॅस पुरविण्यासाठी सीएनजी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट स्थापना करण्यात आली आहे. या जागा ३० वर्षांच्या भाडेकराराने देण्यास मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.खराडी, बावधन (दोन जागा), बालेवाडी (दोन जागा), बाणेर (दोन जागा) आणि कोथरूड येथील एक अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागा एमएनजीएलला सीएनजी स्टेशनसाठी देण्यात येणार आहेत. या जागांच्या बदल्यात महापालिकेला वर्षाकाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचे भाडे प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सीएनजी गॅस प्रकल्प सुरू झाल्यास, त्याचा लाभ सार्वजनिक तसेच खासगी वाहनासाठी होणार आहे.  तसेच पुणे शहरातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांनी सीएनजी स्टेशनसाठी पुणे महानगरपाल्आिकेच्या ताब्यातील अ‍ॅमिनिटी स्पेसची (सुविधा क्षेत्राची) मागणी केली आहे.  शहरात सीएनजी स्टेशन वाढल्यास शहरात सीएनजी इंधनवर चालणाऱ्या वाहनांची संख्याही वाढणार आहे. तसेच गॅसवर १.२० रुपये सबसिडी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.