शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निमगाव केतकी ग्रामीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

निमगाव केतकी: वाढता उन्हाळा त्यातच ग्रामीण रुग्णालयाच्या विंधनविहिरीवरील विद्युतपंप जळाल्यामुळे गेल्या ८ ते १० दिवसांपासून रुग्णालयासह वसाहतीमधील पाण्याच्या ...

निमगाव केतकी: वाढता उन्हाळा त्यातच ग्रामीण रुग्णालयाच्या विंधनविहिरीवरील विद्युतपंप जळाल्यामुळे गेल्या ८ ते १० दिवसांपासून रुग्णालयासह वसाहतीमधील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीत आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावून समाजहिताचे काम करत आहे. पण, त्यांनाच त्यांचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी साधे पाणीही पुरेसे मिळत नसल्याने नक्की सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था काय करत आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी पुरेसे मिळत नसल्यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे निवासी कर्मचारी सिस्टर यांनी सांगितले. ही पाणी गैरसोय पाहून जन प्रहार संघटने तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी पाणी टँकर पुरवून गैरसोय दूर केली. या वेळी प्रथम निमगाव केतकीचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप यांना भ्रमणदूरध्वनीवरून आरोग्य कर्मचारी वसाहत व ग्रामीण रुग्णालयातील पाण्याच्या गैरसोईबाबत विचारणा केली,त्यावर ते आमच्याकडे नसून ग्रामीण रुग्णालय बघेल असे त्यांनी उत्तर दिले. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा संपर्क होऊ शकला नाही.

पाणीपुरवठा सोयीबाबत प्रहार संघटनेने डॉ. एकनाथ चंदनशिवे व डॉ. मिलिंद खाडे यांनी तहसीलदार अनिल ठोंबरे यांचेकडे तक्रार केली.त्याची दखल घेत सरपंच व ग्रामसेवक यांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायतीने पाणी टँकरने द्या, अशी सूचना तहसीलदार ठोंबरे यांनी दिल्या. ते मान्य करत सरपंच डोंगरे यांनी ग्रामसेवक जगताप यांना सूचना पाणीपुरवठा करण्यास सांगितले. या वेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत, अ‍ॅड. सचिन राऊत, गणेश घाडगे, बेबा डोंगरे आदी उपस्थित होते.

निमगाव केतकी येथे आरोग्य कर्मचारी वसाहत व रुग्णालयास टँकरने पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करताना प्रहारचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचारी.

०८०५२०२१ बारामती—०१