शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नीलेशची मृत्यूशी झुंज अखेर थांबली!

By admin | Updated: May 12, 2017 04:54 IST

रात्री पावणेअकराच्या दरम्यान ‘एक हात मदतीचा’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ‘आपला नीलेश गेला’ असा योगेश ढगे यांचा मेसेज आला

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : रात्री पावणेअकराच्या दरम्यान ‘एक हात मदतीचा’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ‘आपला नीलेश गेला’ असा योगेश ढगे यांचा मेसेज आला... आणि नीलेशच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करणाऱ्या त्याच्या वर्गमित्रांच्या अश्रूंचा बांध फुटला. तब्बल अकरा दिवस मृत्यूशी चाललेली नीलेशची झुंज थांबली. २९ एप्रिलला पुणे-अहमदनगर रस्त्यावर प्रणय गावंड याच्या लग्नाच्या पत्रिका वाटत असताना, नीलेश खरात (रा. कळंबोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि प्रणय गावंड यांचा अपघात झाला होता. या अपघातात प्रणयचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी अवस्थेत नीलेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी रात्री ९.४५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूसमयी नीलेशचे वडील, बहीण, मित्र योगेश ढगे, कुलदीप सूर्यवंशी, मेघनाथ आवटे, ससून रुग्णालयात हजर होते. ‘आपला नील्या गेला’ हे कळताच त्यांना अश्रू अनावर झाले. नीलेशच्या मृत्यूची बातमी समजताच वालचंदनगर, कळंब, कळंबोली परिसरावर शोककळा पसरली. बुधवारी (दि. १०) त्याच्यावर कळंबोली (ता. माळशिरस) या त्याच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीतून शिकून नीलेश देहू येथील संत तुकाराम महाविद्यालयात विनाअनुदानित तत्त्वावार शिक्षक म्हणून रूजू झाला होता. मात्र गंभीर अपघाताने त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार हिरावून घेतला आहे. नीलेशच्या उपचारासाठी जमा केलेली रक्कम त्याच्या कुटुंबाला मदत म्हणून देण्यात येणार आहे.