लवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी नीलेश गावडे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची लवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याचप्रमाणे उपसरपंचपदासाठी देखील रंजित राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची ही लवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप भोसले व ग्रामसेवक व्ही. डी. साकोरे यांनी काम पाहिले.
नीलेश गावडे व रंजित राऊत यांची बिनविरोध निवड होताच लवळे गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत जोरदार जल्लोष करण्यात आला. या वेळी शामराव शितोळे, बाळासाहेब टकले, अशोक भोसले, आनंदा राऊत, भाऊ केदारी, राजाराम गावडे, प्रकाश राऊत, गणेश गावडे,बाळासाहेब सातव, दिनकर राऊत,दत्ता मोरे,हिरामण शितोळे,विजय राऊत तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षित युवा तरुण बनला गावचा उपसरपंच
युवा उपसरपंच
रंजित तानाजी राऊत हा युवक वयाच्या केवळ चोवीस वर्षांचा असून इतक्या कमी वयात लवळे ग्रामपंचायतीचा सदस्य व उपसरपंच होण्याचा मान पहिल्यांदाच रंजितने मिळविला आहे. लवळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे. शिवाय रंजित हा तरुण उच्चशिक्षित असून त्याने बी फार्मसी ही पदवी धारण केलेली आहे.
लवळे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच नीलेश गावडे व उपसरपंच रंजित राऊत यांचा
सत्कार करताना उद्योजक नाथा राऊत, ऋषिकेश राऊत, निवडणूक निर्णय अधिकारी भोसले व
ग्रामसेवक व्ही. डी. साकोरे.